रेल्वेतून पडून एका अनोळखी युवकाचा मृत्यू-राजुरा शिवारात रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह

0
814

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

रेल्वेतून पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने एका ३० ते ३५ वर्षीय युवकांचा मृत्यू
झाल्याची घटना राजुरा शिवारात रेल्वे ट्रॅक गुरूवारी (ता.२९) सकाळी उघडकीस
आली.

सदर युवकाची ओळख पटलेली नाही. सदर अनोळखी युवकांचा वर्ण गोरा असुन उंची
१६४ सेमी, अंगात निळ्या व हिरव्या आडव्या पट्ट्याचे फुल बाह्याचे शर्ट व काळा
पॅन्ट घातलेला आहे. उजव्या हाताच्या पंजावर ओम काढलेले व ‘गोपाल ’ असे गोंदलेले
आहे. या संदर्भात कोणालीही माहिती असल्यास त्यांनी त्वरीत चांदूर रेल्वे पोलीस
स्टेशनशी संपर्क  साधावा असे आवाहन चांदूर रेल्वे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांनी केले
आहे.