लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – जुगलकिशोर लोहिया

0
1207

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – जुगलकिशोर लोहिया

प्रतिनिधी :दिपक गित्ते / नितीन ढाकणे

 

जवाहर शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी यांच्या मार्फत ५ वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३१ मार्च रोजी ही स्पर्धा सकाळी ९ वाजता तोतला मैदानावर घेण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा नंतर विध्यार्थी व पालकांसाठीही शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून श्री. संजय कुलकर्णी संचालक आय . आय. टी प्रतिष्ठान पुणे हे असणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया यांची उपस्थिती असणार आहे.