अपयशाने खचून न जाता आनंदी मनाने स्वतःचे आयुष्य रेखाटा – ना पंकजाताई मुंडे

0
899
Google search engine
Google search engine

अपयशाने खचून न जाता आनंदी मनाने स्वतःचे आयुष्य रेखाटा – ना पंकजाताई मुंडे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अॅकॅडमीतर्फे परळीत भरली स्पर्धा परिक्षेची जत्रा ; तालुक्यातील पहिलाच ऐतिहासिक उपक्रम

बीड :नितीन ढाकणे
        दिपक गित्ते

दि. ३१ —– सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खडतर मेहनत तर घ्याच पण थोड्याशा अपयशाने खचुन जाऊ नका. आनंदी मनाने स्वतःचे आयुष्य रेखाटा असा मोलाचा सल्ला राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे विद्यार्थ्यांना दिला.

  

 

जवाहर शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अॅकॅडमी तर्फे परळी येथे इयत्ता ५ वी ते ९ वी च्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने शालेय पातळीवर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर आज आयोजित करण्यात आले होते. तोतला मैदानावर झालेल्या या शिबीरात परळी तालुक्यातील दीडशेहून अधिक शाळांमधील सुमारे दहा ते बारा हजार  विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळच्या सत्रात या विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

दुपारी शिबीराचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आयआयटी प्रतिष्ठान व करिअर स्पेक्ट्रम पुण्याचे संचालक संजय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्ताप्पा इटके, सुरेश अग्रवाल, सुरेश चौधरी, विजय वाकेकर, कैलास घुगे, प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. ना. पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे यांचे संस्थेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. पंकजाताई मुंडे  म्हणाल्या की, या वयातच आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे हे ध्येय विद्यार्थ्यांनी ठरवले पाहिजे. आजची पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे.  व्यसन लावून घ्यायचेच असेल तर ते यशाचे लावून घ्या. ते लागले तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही.आजचे युग हे डिजिटल झाले आहे. त्याचा उपयोग करत स्पर्धेत कायम टिकून रहावे. आपल्या भागातील विद्यार्थी मेहनती आहेत स्पर्धेत राहून त्यांनी परळीचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपले आयुष्य हे आनंदी मनाने रेखाटून आपल्या आई वडिलांचे स्वप्न आत्मविश्वासाने पुर्ण करा.


राजकारणाच्या माध्यमातून परळीचा विकास एवढेच फक्त मला करायचे नाही तर लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे चांगले विचार, चागले संस्कार असणारी भावी पिढी मला निर्माण करायची असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी देखील  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परिक्षांना धाडसीपणाने सामोरे जावून आयुष्य घडवावे असे आवाहन केले.   स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.