लोकायुक्ताच्या पत्राची मुख्याधिकाऱ्यांनी नाही केली पुर्णपणे अंमलबजावणी – १० वर्षापासून वयोवृध्द न. प. सेवानिवृत्तांना हेलपाटे

0
662
६ व्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी अजुनही नाही मिळाली
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –
 चांदूर रेल्वे नगरपालीकेने १/०१/२००६ पासुन ६ वा वेतन आयोग लागु केला. चांदूर रेल्वे नगरपालीकेतून २२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १/०४/२००९ पासुन सहावा वेतन आयोगानुसार सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. परंतु १/०१/२००६ ते ३१/०३/२००९ पर्यंत असे एकुण ३९ महिण्यांची निवृत्तीवेतनाची प्रत्येकी तीन हजार थकबाकी मिळायची बाकी होती. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी १० वर्षापासून न.प.प्रशासनाचे उंबरठे झिजवित होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. शेवटी त्यांनी लोकआयुक्तांचे दरवाजे ठोठावले. लोकआयुक्तांनी न.प. प्रशासनाला त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही केवळ ३० हजाराची रक्कम २२ मे २०१७ ला अदा केली. उर्वरीत रक्कम १ महिण्यात देतो म्हणुन आता १० महिन्यांता काळ लोटला तरीही त्यांना उर्वरीत रक्कम मिळालेली नाही. लोकायुक्तांच्या पत्राची मुख्याधिकाऱ्यांनी पुर्णपणे अजुनही अंमलबजावणी केली नसुन थकीत रक्कमेतुन प्रत्येकाची न. प. कराची रक्कम कपात करून उर्वरीत रक्कम त्वरीत देण्याची मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शनिवारी मुख्याधिकाऱ्यांना व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
       चांदूर रेल्वे नगरपालीकेत विविध पदावर प्रदिर्घ काळ सेवा देऊन २२ कर्मचारी सेवानिवृत्त झाले.चांदूर रेल्वे न.प. ने १/०१/२००६ ला कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागु केला. हे सर्व २२ सेवानिवृत्त कर्मचारी १/०४/२००९ पासून सहाव्या वेतन आयोग प्रमाणे सेवानिवृत्ती वेतन उचलत आहे.परंतु १/०१/२००६ ते १/०४/२००९ असे एकुण ३९ महिण्याचे ९ लाख ३५ हजार ११९ रूपये थकित होते. या सर्वांनी वयाची ६५ वी पार केली असून अनेकजन आजारी आहेत. त्यांच्या कुटूंबाला या रक्कमेची औषधोपचारासाठी अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न.प. प्रशासनला अर्ज, निवेदन देऊन वारंवार विनंती केली. परंतु प्रश्न मार्गी न लागल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी लोकआयुक्ताकडे धाव घेतली होती. लोकआयुक्तांनी दखल घेत हा प्रश्न त्वरीत निकाली काढा असे
 आदेश १/०७/१६ ला न.प. प्रशासनाला दिले. या आदेशाच्या १०  महिण्यानंतर १७ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३० हजार व ५ कर्मचाऱ्यांना पुर्ण रक्कम २२ मे रोजी अदा केली. व १७ कर्मचाऱ्यांना उर्वरीत रक्कम एका महिण्यात अदा करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते. या आश्वासनाला १० महिण्यांचा काळ लोटला तरी अद्यापही या कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी लोकायुक्ताच्या पत्राची अंमलबजावणी अजुनही पुर्णपणे केलेली नाही. शेवटी या कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेतुन न.प. कराची प्रत्येकाची रक्कम कपात करून उर्वरीत रक्कम तत्काळ द्यावी अशी मागणी शनिवारी मनोहर मानकानी, उत्तमराव गावंडे, हृदेश तिवारी, शांतीलाल कर्से, कलावती यादव, मोरेश्वर झिंगरे, बलदेव वानखडे, सुलेमानशाह रहमानशाह, लताबाई सहारे, वसंत बोबडे, कलाबाई यादव, लक्ष्मण आवतरामाणी, वसंत गहुकार, सुरेश पापडकर, भाष्कर चनोटकार, रामचंद्र मकेश्वर यांनी मुख्याधिकाऱ्यांना व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
अल्पसंख्यांक असल्यामुळे झिझवावे लागत आहे उंबरठे ? 
      या २२ कर्मचाऱ्यांमध्ये सुलेमानशाह रहमानशाह यांचा समावेश आहे. ते न.प.मध्ये ट्रॅक्टर चालक होते. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांची ९३ हजार ५५१ ही सर्वात मोठी रक्कम आहे. यामधील त्यांना केवळ ३० हजार रूपये मिळाले असुन ६३ हजार ५५१ रूपये अजुनही थकीत आहे. त्यांची परीस्थिती हलाखीची असल्याने व घरी कार्यक्रम असल्यामुळे त्यांना ३० हजारानंतर अजुन लगेच २० हजार देण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी कबूल केले होते. परंतु अजुनही त्यांना तीस हजारानंतर १० महिन्यांत कोणतीही रक्कम मिळालेली नाही. सदर वृध्द अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना मुख्याधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याची खमंग चर्चा कर्मचाऱ्यांतुन ऐकावयास मिळत आहे.