दारूबंदी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी एप्रील फूल – श्री प्रशांत कोल्हे

0
600

सुनील कोडापे/ चिमूर –

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या निर्णयाला आज तिन वर्षाचा कालावधी होतो . घोषणे वेळी शासनाकडून कठोर कायद्याची अमलबजावणी, विषेश पथक असे अनेक आश्वासनाचा पाऊस पाडला गेला .परंतू आश्वासनाची पूर्तता न झाल्याने तसेच कायद्याचा वचक नसल्याने हि दारूबंदी एप्रिल फूल आहे . असे मत मनसे तालूका अध्यक्ष तथा उपसरपंच प्रशांत कोल्हे यांनी व्यक्त केलं .

वृत्ताला माहीती देतांना दारूबंदी असतांना जिल्ह्यात , गुन्हेगारीचे प्रमाण अपघाताचे प्रमाण , तंटे , दारूविक्रींचे गुन्हें दूप्पट असल्याने दारूबंदी मागील शासनाचा नेमका हेतू कळत नाही . यात दारूबंदीची यशस्वी अमलबजावणी झाली नसल्याने जिल्ह्यातील जनतेची पालकमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी . असेही मत व्यक्त केल .
त्यातच १५ एप्रील नंतर मा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा विदर्भ दौरा असून त्यात दारूबंदी हा विषय लक्षणीय असेल आदेशानंतर पुढील आंदोलणाची दिशा ठरवू अशी माहिती प्रशांत कोल्हे यांनी वृत्ताला दिली .