शिवसेनेच्या प्रयत्नातून जळका जगताप गावातील पाणी टंचाई वर केली मात – पाणी समस्येवर युवा नेते कौस्तुभ खेरडे यांनी काढला तोडगा

0
1115
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )  

       चांदूर रेल्वेवरून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जळका जगताप या ग्राम पंचायतमध्ये मागिल ३ वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. ही सोडविण्यासाठी शिवसेनेचे कौस्तुभ खेरडे यांनी गावातील लोकांना स्वतःच्या शेतातील पाणी टँकरने वाटण्याचा निर्धार केला असून राजकारणा पेक्षा समाजसेवा ही अतिशय महत्वाची आहे हे सिद्ध केले.

आज पाणी हे या भूतलावर महत्वपूर्ण घटक असून मुबलक पाण्यासाठी निसर्ग ही साथ देत नाही. एकविसाव्या शतकात माणसाने आपले पाऊल ठेवले प्रत्येक क्षेञात प्रगती केली पण पाणी या विषयावर मनूष्य व त्यांची विचार करण्याची शक्ती ही अपवाद ठरली आहे. म्हणून पाणी ही एक मोठी समस्या शेतकरी,शेतमजूराला जानवत असून आज पाण्यासाठी प्रत्येक जिव वन वन भटकत आहे. अशीच परिस्थिती जळका जगताप या गावाची झाली आहे. या गावातील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कौस्तुभ खेरडे यांच्या ही बाब लक्षात की, आपल्या गावाती बेलमंडळी ही नदी पुर्णता आटली आहे. या नदीला मागिल ३-४ वर्षापासून मुबलक पाणी न आल्याने आज आपल्या गावात पाण्याची भिष्ण समस्या निर्माण झाली आहे. ह्या समस्येवर मात करण्यासाठी कौस्तुभ यांनी आपल्या २८ एकरातील संञा बागायतीची पर्वा न करता गावतील लोकांकरीता स्वतःच्या खर्चातून ट्रकँरने पाणीपुरवठा करण्याचा निर्धार केला. रविवारी सकाळी १० वाजता जळका जगताप येथील श्री पांडूरंग महाराज संस्थान या मंदिरात पूजन करून शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड व तालुका प्रमुख राजू निंबर्ते, उमेश घुरडे, दिवाकर खेरडे, भरत खेरडे यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या ६ नळ असलेल्या टँकरचे उद्घाटन करून गावातील जनतेकरीता पाणी वाटपाला सुरूवात केली. दररोज ५ टँकर पाणी (दैनंदिन २५००० लिटर पाणी) व तर गावातील कुठल्याही कार्यप्रंसगी मोफत टँकरने पाणी वाटपाचा निर्धार केला आहे. या वेळी रामटेके ग्रा.प.सदस्य, राजू काळे, हेमंत हटवार, प्रकाश जयसिंगपुरे, आसिफ पठाण, स्वप्निल मानकर, मोरेश्र्वर पाटील, विनोद बागडे, प्रणव बोके, रामदास घरडे, अतुल जुमडे, संजय रामटेके, जावेद पठाण, प्रफुल्ल बुरखडे, अण्णा रामटेके, नवदिप गाडेकर, जिरापुरे, कार्तिक हांडे, विजय जयसिंगपुरे, पंकज कोटके, राजेश लोणारे, महेश भरडे, अजय जयसिंगपुरे, मंगेश कावळे, लखन मेडकेवार व जळका जगताप येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      राजकारणा पेक्षा समाजसेवा करण्याची जिद्द मनात ठेवून कौस्तुभ खेरडे यांनी आपल्या शेतातील ४ हजार संञ्याच्या झाडाची पर्वा न करता स्वतःच्या खर्चाने दररोज ५ टँकर पाणी गावांतील जनतेला देण्याचा निर्णय केला. हा महत्वपुर्ण असून अमुल्य आहे. कौस्तुभ च्या ह्या निर्णयामुळे सर्वञ त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. “पाणी समस्या मुक्त माझे गाव” हा संदेश कौस्तुभने आज महाराष्ट्राला दिला आहे.