*शेतकरी संघटना युवा संपर्क बैठक दर्यापूर येथे उत्साहात संपन्न*

0
753
Google search engine
Google search engine

शेतकरी संघटनेचा प.विदर्भ युवा संवाद दौरा दि.१एप्रिल २०१८ पासून दर्यापूर येथून प्रारंभ झाला .

संतोष विनके:-

काल दर्यापूर तालुक्यातून अनेक युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी युवा संपर्क दौऱ्याला हजेरी लावली.
सदर बैठकीला शेतकरी संघटना युवा आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष सतिष दाणी,शेतकरी संघटना प्रवक्ता ललीत दादा बहाळे, युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष डॉ.निलेश पाटील,सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष विलास ताथोड,प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,अमरावती जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे,जेष्ठ नेते विजय विल्हेकर,राजाभाऊ पुसदेकर,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाकोडे,अकोला जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट,अंजनगाव तालुका प्रमुख गजानन राव दूधाट, यांच्यासह दर्यापूर तालुक्यातील बहुसंख्य युवक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका युवा आघाडी अध्यक्ष निखिल भायने यांनी केले होते.येत्या २२एप्रिल रोजी अकोट येथे आयोजीत युवा परिषदेच्या प्रचारासाठी प.विदर्भ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे,त्यानिमित्त दर्यापूर ची सभा पार पडली.
या प्रसंगी बोलतांना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी यांनी देशातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती व युवकांची भूमिका या विषयी शेतकरी संघटनेची भूमिका विषद करून अकोट येथील प्रस्तावित मेळाव्यास मोठया संख्येने येण्याचे आवाहन केले.युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष डॉ.निलेश पाटील यांनी आपल्या संबोधनात
आज देशातील साठ प्रतिशत पेक्षा अधीक लोकांचा रोजगार असलेल्या शेती व्यवसायासमोर मोठे प्रश्नचिन्ह प्रचलीत धोरणांनी उभे करून ठेवले आहे.ग्रामीण भारत एका अस्वस्थ वर्तमानाच्या व दिशाहीन भविष्याच्या सावटातून जात आहेत.शहरे नियोजन शून्य स्थलांतराच्या बोज्याने गुदमरत आहेत.
एकीकडे जल,जंगल, सारख्या संसाधनांचे दुर्भिक्ष्य दुसरी कडे मानवी संसाधनां मधील वाढते नैराश्याने देशाला ग्रासले.
हातांना काम नाही,क्षमतांना संधी नाहीत,व्यवसाय ,उद्योजनतेला मोकळीक नाही या सर्वांचे एकत्रीत दुष्परिणामांना संपूर्ण पिढीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिवेशा मध्ये सर्वांना फुलण्याची संधी देणारा शेतकरी संघटना व शरद जोशींचा *भारत उत्थान कार्यक्रम* हाच काय तो पर्याय म्हणून दिसत आहे. तुमच्या मधील उत्पादकतेला व उद्योजकतेला वाव मिळाल्याशिवाय समर्थ राष्ट्राचे निर्माण होऊ शकणार नाही.त्या साठी मोकळीक देणारी योग्य धोरणे,संसाधने,संरचना आदींचे निर्माण प्रथम गरजेचा आहे.
या उद्देशाने युवा पिढीला जागवण्यासाठी शेतकरी संघटना प्रयासरत आहे.असे विशद केले.
ललित बहाळे यांनी सरकार शेतकऱ्यांचे कल्याण करू शकत नाही म्हणून सरकारने शेती व्यवसायातील हस्तक्षेप थांबवावा या साठी शेतकरी पुत्र यांनी लढण्यास पुढाकार घ्यावा.असे आवाहन केले.आपल्या उदबोधनातून त्यांनी संरक्षण व्यतिरिक्त इतर बाबींमध्ये सरकार ने हस्तक्षेप थांबवावा हे अनेक उदाहरणां द्वारे पटवून सांगीतले.
मेळाव्यात विजय विल्हेकर यांनी गायलेल्या अंगारमळा या विठ्ठल वाघांच्या कवितेने स्फुरण चढविले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन धनंजय मिश्रा यांनी केले. कार्यक्रमात युवा आघाडीच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
शेतकरी संघटनेचे शपथ घेउन व घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यापुढे तालुक्यातील गावागावांत शेतकऱ्यांचा जागर करून संघटन वाढवण्याचा संकल्प करण्यात आला.
दर्यापूर नंतर सदर संपर्क दौरा अकोट,अकोला,मूर्तिजापूर,मंगरुळपीर,यवतमाळ,चिखली असे या दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.

दौऱ्यातील प्रत्येक ठिकाणी युवा कार्यकर्ता बैठक,पदाधिकारी नियुक्त्या,पत्रकार परिषदेतुन शेतकरी संघटनेच्या वर्तमान परिस्थितीवरील भूमिकेची मांडणी व काही ठिकाणी संध्याकाळी एक जाहीर सभा होणार आहे.
शेतकरी संघटना स्वतंत्रता वादी युवा चळवळीच्या निर्माणासाठी प्रयासरत असून त्या शिवाय दुसरा पर्याय सद्यस्थितीत दिसत नाही.
मित्रांनो आपणही या प्रवाहात सहभागी व्हा!
उत्पादकांच्या न्यायासाठी,उद्योजकतेच्या संधींसाठी, भारत उत्थानासाठी बुद्धिवादी शेतकरी पुत्रांनी मोठ्या संख्येने या संपर्क दौर्यातील मार्गदर्शनाला उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटने तर्फे करण्यात येत आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती — सतीश दाणी प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी,ललीत बहाळे प्रवक्ता शेतकरी संघटना,डॉ निलेश पाटील युवा आघाडी विदर्भ प्रमुख,सतीश देशमुख जेष्ठ नेते,सुरेश भाऊ जोगळे,जेष्ठ नेते,धनंजय भाऊ मिश्रा,प.विदर्भ शेतकरी संघटना प्रमुख,विलास भाऊ ताथोड, सोशल मीडिया प्रमुख अविनाश नाकट जिल्हाध्यक्ष अकोला,प्रफुल्ल बदरखे अकोट तालुका प्रमुख,विक्रांत बोन्द्रे अकोट तालुका युवा आघाडी प्रमुख,लक्ष्मीकांत कौठकर तेल्हारा तालुका प्रमुख,निलेश नेमाडे तेल्हारा युवा आघाडी प्रमुख
*संपर्क सूत्र* – *डॉ प्रवीण गायगोळ कान्हेरी सरप* *दिनेश* *लोहोकार* *हारूण शहा हिंगणी ता अकोला*, *विनोद राऊत मळसुर* *ता.पातूर* *सतीश ठाकरे* *नीहीदा* *ता.बार्शीटाकळी* *संदीप सूर्यवंशी कपिलेश्वर ता.अकोला*, *श्याम ठाकरे* *ता.बाळापूर* यांची होती