तालुका स्तरिय जनसंवाद सभेत -ग्रामीण रूग्णालयाच्या रिक्त पदांचा मुद्दा गाजला

0
811
Google search engine
Google search engine

दीड वर्षापासून कारकून नाही, महिलांनी मांडल्या समस्या
प्रा.आ.केंद्र समस्याग्रस्त

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

येथील ग्रामीण रूग्णालयात दीड महिण्यापासून कारवूâन नसल्याने शासकिय देयकेसह अनेक
काम अडली आहे. या शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राचीही पदे रिक्त आहेत. अशी नाराजी
ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणात शेकडो महिलाच्या उपस्थितीत झालेल्या तालुका स्तरिय
जनसंवाद सभेत व्यक्त करण्यात आली.

अपेक्षा होमिओ सोसायटीच्या राष्ट्रीय आरोग्य देखरेख अभियानांतर्गत देखरेख समितीची सभा
पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चांदूर रेल्वे पंचायत समिती सभापती छबुताई जाधव, प्रमुख
पाहूणे म्हणून पंचायत समिती सदस्य भीमराव करवाडे, वैद्यकिय अधिक्षक प्रफुल मरसकोल्हे,
आमला सरपंच रजनीताई मालखेडे, सावंगी संगम सरपंच सरिता राऊत, प्रदीप बनसोड,
बालाजी वाघ, वैद्यकिय अधिकारी राठोड, श्रीकृष्ण मते, प्रभाकर भगोले, प्रा.रवींद्र मेंढे
उपस्थित होते. सभेत सदस्यांनी आरोग्य विभागाबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली. प्रारंभी
प्रास्ताविक भाषणात आरोग्य उपकेंद्राची  दूरावस्था, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे,ग्रामीण
रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची तीन वर्षात बदली व औषधसाठ्यात वाढ आदी बाबींची
मुद्देसूद मांडणी मनू वरठी यांनी केली. रूग्णांना अधिक सुविधा मिळाव्या, असे मत सोमेश्वर
चांदूरकर यांनी मांडले. ग्रामीण रूग्णालयात दोन वर्षात विविध बाबींची सुधारणा करण्यासाठी
शासनाकडून २ लाख ४८ हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले. परंतु देयके तयार करण्यासाठी
कारवूâन नाही. तालुका आरोग्य विभागाकडून सहारे यांना १५०० रूपये मानधनावर ठेवण्यात
आले आहे, अशी माहिती डॉ.मरसकोल्हे यांनी दिली. या सभेला संगीता थेटे(मोगरा),सिंधूबाई
दरणे(शिरजगाव कोरडे), सरला भगत (मांडवा), इंदूबाई कावलकर (मांजरखेड),सविता धारणे
(जवळा) यांनी अंगणवाडी व आरोग्य विभागाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या.

लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची  पाठ

सभेला ग्रामीण भागातील शेकडो महिला भर उन्हात दाखल झाल्या होत्या.तथापि,आंमत्रित
लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या आयोजनाला पाठ फिरविल्याचे दिसून आले.

 

विद्यार्थिनीने मांडल्या गाऱ्हाणे

दहिगाव धावडे येथील जि.प.शाळेची पाचवीची विद्यार्थीनी ऐश्वर्या मते हिने शालेय
विद्याथ्र्यांची आरोग्य तपासनी होत नसल्याचे सभेत सांगीतले.यामुळे नेत्रदौबाल्य, कर्णबधिरता
या विद्याथ्र्यांच्या समस्या पूढे येतच नाहीत. ही तपासनी नियमित व्हावी असे म्हणत तिने
उपस्थितांचे लक्ष वेधले.