ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

0
820
Google search engine
Google search engine

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

  प्रतिनिधी दिपक गित्ते व नितीन ढाकणे

जेष्ठ समाजवादी   नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे पुण्यात निधन झाले. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता. त्या आजारावर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी मंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र ‘भाई वैद्य’ याच नावाने परिचित होते. शालेय जीवनातच 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते.

देशात आणीबाणी लागू झाली, त्यावेळी आणीबाणीविरोधात लढताना त्यांना 19 महिने तुरुंगात जावे लागले होते. महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री, पुण्याचे महापौर, जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांसह अनेक महत्त्वाची पदे भाईंनी भूषवली होती.

त्यांना विदर्भ २४ न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐