न.प.ने शिवाजी नगर भागातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

0
789

न.प.ने शिवाजी नगर भागातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी दिपक गित्ते व कृष्णा फड

परळी शहरातील शिवाजी नगर भागात मागील काही वर्षांपासून मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असुन त्यामुळे तेथील नागरीक त्रस्त आहेत. सदरील प्रकरणात न.प. प्रशासनाने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी युवा मित्र मंडळ शिवाजी नगर, परळी वै यांनी न.प. परळीचे सहा.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे यांना लेखी निवेदन दिले आहे.

सविस्तर माहिती अशी की, या भागात या मोकाट जनावरांमुळे लहान मुलांवर वराह हल्ला झाल्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नये याची उपाययोजना न.प. प्रशासनाने त्वरीत करावी. परिसरात वराहांचा व्यवसाय करणार्‍यांनी जनावरे मोकाट न सोडता बंदिस्त ठेवून परिसरात स्वच्छत राखावी. जेणेकरून शिवाजी नगर व परिसरातील सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यावर न.प. प्रशासनाने चोख देखरेख ठेवावी असे न झाल्यास भविष्यात या प्रकरणी आमरण उपोषण व  आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल असा इशारा यावेळी युवा शक्ती मित्र मंडळाच्यावतीने अविनाश घुगे, अ‍ॅड. बुध्दरत्न उजगरे, महेश मुंडे, प्रशांत कदम, पवन वाघमारे, विकी पारधे, सुनिल जाधव, अरविंद तरूडे, ईश्‍वर मुरकुटे, महेश बचुटे, नितीन खलते, आकाश देवरे, बाळु ठोके, आकाश डहाळे, गोविंद फड, वैभव जगताप, प्रदिप राठोड, विकास रूपनर, कृष्णा घनघाव, विशाल तिडके, शैलेश मुंडे, निखील झिंर्जुडे, सतीश बारसल्ले, अतुल जाधव, विकास पिडणे, रूपेश गव्हाणे, शेखर कांबळे आदिंनी दिला आहे.