मनुष्य अन्न-पाण्यावाचून राहू शकतो; मात्र धर्माशिवाय राहू शकत नाही ! – बाबा चंद्रमोहन अज्ञानी नाथजी महाराज

0
582
Google search engine
Google search engine

गरोठ (मध्यप्रदेश) – मनुष्य अन्न-पाण्यावाचून राहू शकतो; मात्र धर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, असे प्रतिपादन गरोठ येथील बाबा चंद्रमोहन अज्ञानी नाथजी महाराज यांनी केले.

हुतात्मादिनानिमित्त महाराणा युवा संघाच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आणि धर्मसभा यांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला श्री श्री १००८ श्री बालकदासजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी नोएडा येथील आंतरराष्ट्रीय कवी अमित शर्मा, देहली येथील पंचगव्य गुरुकुलम्चे श्री. वीरेंद्र सिंह, उज्जैन येथील वागर्थ पीठाधीश्‍वर आचार्य अखिलेश महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी संबोधित केले.

श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, ‘‘देशात अजूनही भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना हुताम्यांचा दर्जा देण्यात आला नाही, उलट ‘एनसीईआरटी’ च्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा आतंकवादी असा उल्लेख करण्यात आला.’’