भारतीय स्टेट बँक मोंढा परिसर चोरांचा अड्डा बनले

0
530
Google search engine
Google search engine

भारतीय स्टेट बँक मोंढा परिसर चोरांचा अड्डा बनले

बीड: नितीन एस ढाकणे, दिपक गित्ते

बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेली व्यक्ती बाहेर पडताच पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी हजारोंचा ऐवज गुरूवारी दुपारीच लूटला आहे. येथील हैद्राबाद बँक शाखेच्या समोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये चोरट्यांनी ८९ हजार २०० रुपये लूटले असून आरोपी फरार झाले आहेत. गुरूवारी सकाळी तालुक्यातील लाडझरी येथील नकेश कांबळे हे आई समवेत पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. नकेश यांनी पैसे काढले आणि आपल्या दुचाकीच्या डिक्कीत पैसे ठेवले. काही अंतरावर असलेल्या भाजीमंडईत नकेशा व त्यांची आई जात असतानाच पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी डिक्कीतील पैसे काही क्षणात हडप केले. सुमारे ८९ हजार २०० रुपये क्षणार्धात चोरी गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गेलेली रक्कम परत मिळेल का अशी आर्त हाक नकेशच्या आईने दिली होती. पोलीस प्रशासनाने त्वरीत यंत्रना हलिवली आहे. त्यानुसार बँक परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरामध्ये सदरील घटना नमूद झाल्याने आरोपींना शोधण्यास मदत होणार आहे. याप्रकरणी परळी शहर ठाण्यात दुपारी ३ च्या दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे तपास करीत आहेत.