अच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे

387

अच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे

बीड: नितीन एस ढाकणे

भाजप सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न आता घराघरात चेष्टेचा विषय झाला आहे, हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्‍पा सुरू असून आंदोलन पाचव्या टप्प्यात जाईल, तेव्‍हा भाजप सरकार संपलेले असेल, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्‍हणाले. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या हल्‍लाबोल आंदोलनाचा चौथा टप्‍पा सुरू असून आज तासगाव सांगली येथे आंदोलन झाले. यावेळी सभेत बोलताना मुंडे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.

यावेळी मुंडे यांनी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघावरही निशाणा साधला. “बरं झालं की १६ व्या शतकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ अस्तित्वात नव्हता, नाहीतर हे संघवाले म्हणाले असते की छञपती शिवाजी महाराज सुद्धा संघाचे होते,” अशी बोचरी टीका राजगुरु प्रकरणावरून मुंडे यांनी संघावर केली.

 

जाहिरात