१३ दिवसानंतरही लावारीस गांजा प्रकरणात तळेगाव पोलीसांची चौकशी थंडबस्त्यात @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

0
668
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 
     चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) या गावाजवळील बेंबळा नदीच्या धरणाच्या काठावर २३ मार्च रोजी १ क्विंटल २४ किलो ८९० ग्रॅम बेवारस स्थितीत गांजा आढळला होता. परंतु १३ दिवसानंतरही या प्रकरणात तळेगाव पोलीसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही.
    चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील बेंबळा नदी धरणाच्या काठावर झुडपामध्ये २३ मार्चला सायंकाळी ८ वाजता ओला गांजा बेवारस स्थितीत पडलेला आढळून आला होता. ही गुप्त माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळतात ठाणेदार उपाध्याय, धामणगाव रेल्वेचे ठाणेदार लांडे व नायब तहसीलदार सवई यांनी घटनास्थळ गाठून १ क्विंटल २४ किलो ८९० ग्रॅम गांजा अंदाजे किंमत ६ लाख २४ हजार ६७० रूपयांचा माल ताब्यात घेतला होता. या प्रकरणात तळेगाव पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. परंतु तब्बल १३ दिवसानंतरही पोलीसांना या प्रकरणाचा थांगपत्ता लागलेला आहे. या गांजा सापडण्याच्या केवळ दोन तासांपुर्वी छत्तीसगड पोलीसांनी याच परिसरात येऊन एका महिला गांजा तस्करला अटक केली होती. या महिलेच्या अटकेनंतरच तळेगाव पोलीसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कसा सापडला या विषयी अनेक तर्क वितर्क काढण्यात येत होते. या अवैध धंद्याबाबत तळेगाव पोलीसांचे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत असतांना मात्र सदर प्रकरणात पोलीसांचा तपास थंडबस्त्यात सुरू असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात तळेगाव पोलीस स्टेशनचे थानेदार उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.