माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंना वाहिली आदरांजली >< प्रथम पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन

0
706
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       शेतकरी – शेतमजुर, गोर – गरीबांचे कैवारी, ओ.बी.सी. स्कॉलरशीपचे शिल्पकार, रेल्वे थांब्याचे जनक, जनता दलाचे नेते, माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्य आयोजित एका कार्यक्रमात कार्यकर्ते व मित्र मंडळींनी आदरांजली वाहीली.
     स्थानिक ढोले कॉम्पलेक्समध्ये शुक्रवारी दुपारी आयोजीत छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. विनोद जोशी होते. सर्वप्रथम डॉ. क्रांतीसागर पांडुरंग ढोले व उपस्थितांनी फोटोचे पुजन,  हारार्पण करून स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंना श्रध्दांजली वाहीली. उपस्थित मान्यवरांनी स्व. डॉ. ढोलेंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ६ एप्रिल २०१७ रोजी स्व. डॉ. ढोलेंचे अपघातात दु:खद निधन झाले होते.
      या कार्यक्रमाचे संचलन श्री. भगत व आभार प्रदर्शन संजय डगवार यांनी केले. यावेळी नितीन गवळी, मेहमुद हुसैन, राजाभाऊ भैसे, विनोद जोशी, गौरव सव्वालाखे, रमेश गुल्हाणे, विनोद लहाने, सुधीर सव्वालाखे, श्री. भगत, प्रमोद बिजवे, शंकरराव आंबटकर, डॉ. उत्तमराव पडोळे, गौतम जवंजाळ, रामकृष्ण पडधान, धर्मराज वरघट, साहेबराव शेळके, दादाराव डोंगरे, अशोक हांडे, अवधुत सोनवने, संजय डगवार, बबन गणवीर, अंबादास हरणे, वासुदेव गुल्हाने, सौ. शोभा मुनकर, देवमन वाटोळे, सुनिल उपरीकर, प्रकाश नागरीकर, विठ्ठल गुल्हाने, महादेव शेंद्रे, भीमराव खलाटे, देविदास शेबे, रूपराव स्थुल, सुरेश तिरमारे, शंकर डंबारे, अशोक रोडगे, भाऊराव शेलोकार, गजानन मरगडे, मनोज सहारे, पंकज गुडधे, चंद्रशेखर सिरसाट, दिलीप राऊत, अर्जुन जिभकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, मित्र मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.