7 एप्रिल रोजी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर : वैभव स्वामी

672
जाहिरात

7 एप्रिल रोजी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर : वैभव स्वामी

बीड : नितीन ढाकणे,दिपक गित्ते

बीड येथे जिल्हा रुग्णालयात तर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उद्या दि 7 एप्रिल 2018 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर होणार आहे .
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या आरोग्य शिबीरात जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ कसा मिळू शकेल यासाठी जनजागृती सह सर्वस्व झोकून देत शर्थीचे प्रयत्न करावेत.

ग्रामीण पत्रकारांनी आरोग्य तपासणी शिबिरात काही अडचण आल्यास पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षाशी तर बीड शहरातील पत्रकारांनी काही अडचण आल्यास पत्रकार अमजद खान, शेख वसीम, शेख आय्युब यांच्याशी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चॉकी जवळ संपर्क साधावा.
संपर्क साधून सुद्धा जर अडचण सुटलीच नाही तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात सर अथवा माझ्याशी आपण संपर्क साधू शकतात, मी आणि पत्रकार संघ आपल्या आरोग्याच्या सेवेसाठी शिबिराच्या कालावधीत पूर्णवेळ हजर आहेत
विनंती एकच आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.
जिल्हाशल्य चिकित्सकांनी जी संधी पत्रकांरासाठी उपलब्ध करून दिली आहे त्याचा लाभ पत्रकार संघाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी तर घ्यावाच घ्यावा परंतु सर्व पत्रकार बांधवाना सुद्धा याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी आपणास नम्र विनंती आहे.
वैभव स्वामी,
जिल्हाध्यक्ष, पत्रकार संघ, बीड

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।