गोंडवाना एक्सप्रेस चे मुर्तिजापूर रेल स्थानक येथे भव्य स्वागत – भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीला यश

0
761
Google search engine
Google search engine

मूर्तिजापूर :-

स्थानीक नागरिक व भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर तसेच आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांची गोंडवाना एक्सप्रेस ला मुर्तिजापूर रेल स्थानक येथे थांबा द्यावा या मागणीला खासदार संजयभाऊ धोत्रे यांनी पाठपुरावा करुन केंद्रीय रेल मंत्रालयातून थांबा मिळवून घेतला.

आज मुर्तिजापूर रेल स्थानक येथे दुपारी 3.30 ला ह.निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस चे प्रथम आगमन प्रसंगी आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर तर्फे पेढे जलेबी वाटप करुन ढोलतासेच्या गजरात रेल चालक नाफेसिंगजी,गार्ड पी.आर.साहू व स्टेशन प्रबंधक ए.डब्ल्यू.देशमुख यांचा शाॅल श्रीफळ पुष्प हार देऊन शहर अध्यक्ष भारत भगत, नगराध्यक्षा सौ मोनालीताई कमलाकर गावंडे, विनायक वारे,डाॅ सुजाता मुलमुले, चंद्रकांत तिवारी, कृष्णराव गावंडे देवीदास गायगोले राधाताई तिवारी यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले. तसेच मुर्तिजापूर रेल स्थानक येथे थांबा दिल्याबद्दल रेल प्रशासनाला शुभेच्छा देऊन आभार मानले.

यावेळी राजू कांबे, राहुल वानखडे, आरिफ भाई, सतिशचंद्र शर्मा, अनिल अग्रवाल, संतोष कपिले, राजू गुल्हाने, विशाल गुप्ता, मुकेश गुप्ता, रवि शर्मा, दिनेश राऊत ,सतिश सारडा, राम खंडारे, सुभाष गोसावी, नायब हसन ,राजू हांडे ,रेल स्थानक मुख्य कार्यालय अधिक्षक जी.बी.मोहरीर, ऑडीटर राजेश दुराडकर, सहाय्यक स्टेशन मास्टर व्ही.एन.गवळी, बी.एस.सुखदेव बुकींग सुपरवायझर मिलींद पठाडे, टि.सी.राबर्ट एन्थोनी,शितल शेरेकर, अमोल उरमुळे, रेल पोलीस पीएसआय खारोडे, शे.कलीम, तुप्पट राजेन्द्र गवई, भरत राऊत, उमेश बिडवे,सुधीर दुबे,योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, ज्ञानू महामूने व पदाधिकारी,कार्यकर्ता व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.