महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या यवतमाळ येथील घंटानाद आंदोलनात शिक्षक महासंघाचा सक्रीय सहभाग

0
1291

जुनी पेंशन योजना ही भविष्यकाळातील आधाराची काठी- श्री शेखर भोयर

निद्रिस्त शासनाला झोपेतुन जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

यवतमाळ :-

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या या घंटानाद आंदोलनास शिक्षक महासंघाचा सक्रीय पाठीम्बा असुन जोपर्यंत 1 नोव्हेम्बर 2005 पूर्वीच्या व नंतरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होत नाही तोपर्यंत शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पाठीशी असल्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले.

यवतमाळ येथे सुरु असलेल्या घंटानाद आंदोलनाच्या वेळी शिक्षक व इतर सर्व कर्मचारी बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.नदीम पटेल, जिल्हा सचिव श्री.प्रविण बहादे, राज्य समन्वयक श्री.सुरेंद्र दाभाडकर,श्री.मिलिंद सोलंकी, श्री.आशीष जयसिंगपुरे, महिला प्रमुख शुभांगी जोई, कु.प्रवीणा पाटिल, श्री.निलेश भागवत, शिक्षक महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.निलेश तायडे, श्री.प्रशांत कडुकार, श्री.ज्ञानेश्वर डाबरे यासह बहुसंख्य शिक्षक व इतर सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

वरिष्ठ व निवड श्रेणी मिळणे हा शिक्षकांचा अधिकार असुन 23 ऑक्टोम्बर 2017 चा वरिष्ठ व निवड श्रेणीचा अन्यायकारक शासननिर्णय रद्द झाला पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 7 वा वेतन आयोग जसाच्या तसा लागु झाला पाहिजे तसेच सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मध्ये वाढ करुण वेतन श्रेणी दुरुस्त झाली पाहिजे.जुनी पेंशन योजना ही आपल्या हक्काची असुन ती मिळाल्या शिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले.