परळीत पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; नराधम आरोपी अटक

0
1255

परळीत पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; नराधम आरोपी अटक

प्रतिनिधी- दिपक गित्ते व नितीन ढाकणे

परळी (प्रतिनिधी ) घराच्या बाजुला खेळणार्‍या एका पाच वर्षीय मुलीस आपल्या घरामध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार काल शहरातील बरकत नगर भागात घडला. या घटनेनंतर तेथील काही लोकांनी सदरिल आरोपीला चांगलाच चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने बरकत नगर भागात संताप व्यक्त केला जात आहे.

7 तारखेला दुपारी शहरातील बरकत नगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. आपल्या शेजारीच असणारी पाच वर्षीय मुलगी अंगणामध्ये खेळत होती. यावेळी तिच्या बाजुला राहणारा शेख इद्रिस शेख बशीर धोबी (४०) यांने मुलीस आपल्या घरामध्ये बोलावून घेतले व तिच्याशी अश्‍लिल चाळे करून तिच्यावर अत्याचार केला. सदरिल मुलगी रडत रडत आपल्या आईकडे आली असता आईने काय झाले असे म्हटल्यानंतर पिडीत मुलीने आपल्यावर बितलेला प्रसंग सांगितला. या घटनेची वार्ता बरकतनगर मोहल्ल्यामध्ये पसरल्यानंतर तेथील नागरीकांनी ठाण्यासमोर एकच गर्दी केली व संताप व्यक्त करण्यात आला होता काही लोकांनी नराधम शेख इद्रिस यास चोप देत याची माहिती परळी पोलिसांना दिली .सदर प्रकरणाची माहिती पथकाला मिळताच अंबेजोगाई विशेष पथकातील भास्कर केंद्रे, सचिन सानप, नरहरी नागरगोजे यांनी घटनास्थळी जावून आरोपीला ताब्यात घेतले त्यांमुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने संभाजीनगर पो स्टेशन परळी पोलिसात फिर्याद दाखल केल्याने आरोपीविरोधात कलम ३७६ २(१)३,४,५ बाल लैंगिक अत्याचार गुन्हा २०१२ नुसार (पोक्सोअंतर्गत) कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खाडे हे करत आहेत.