*शेतकरी संघटनेची दांडी याञेच्या ८८ व्या वर्षपुर्ती निमित्त मोटार सायकल रॅली व सभा सम्पन्न*

0
948
Google search engine
Google search engine

अकोला/संतोष विनके :-

ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेला कर व एकाधिकार शाही विरोधात महात्मा गांधीनि सविनय कायदे भंगाची चळवळ या निमित्ताने देशात रुजवली होती मीठ जरी निमित्त असले तरी नागरिकांच्या स्वतंत्रायवर व मूलभूत आदी कारणावर गदा आणणारे कायदे नागरिक सविनय कायदे भंगकरून मळून काढू शकतात हे संदेश महात्मा गांधी नि दांडी यात्रेतून दिला. कायदे हे नागरिकांच्या स्वतंत्र्याचे व मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी हवेत त्याच्यावर गदा आणणारे नकोत याचे मुळे पहिल्या घटनादुरुस्तीत घुसळवलेल्या परिशिष्ट ९ मध्ये शेतकरी विरोधी कायद्यामध्ये आहे देशातील प्रचलीत धोरणा मुळे शेती व्यवसाय संकटात आला असून लाखो शेतकऱ्यांना आयुष्य सम्पवावे लागले आहे व देशाच्या अर्थकारनावर या धोरणाचा विपरीत परिणाम झाला आहे.

संपूर्ण देशात निराशेचे व हतबलतेचे वातावरण आहे
सम्पतीचा निर्माता असलेला शेतकरी विपन्नावस्थेत पोहोचला असून उद्योग ही फार मोठे पुढेजाऊ शकले नाही देशाला या संकटातून बाहेर काढावयाचे असल्यास श्रमबुद्धी गुंतवणूकिला सन्मान व उद्योजगतेतून राष्ट्रउत्थान या शेतकरी संघटनेचे च्या सूत्रा शिवाय पर्याय नाही या करिता नागरिकांचे घटनादत्त मूलभूत अधिकार उद्योजकतेला मोकळीक व घामाचे दाम या शिवाय पर्याय नाही त्या करिता संविधानात नंतर घुसळवळण्यात आलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना स्वतंत्र न मिळाल्यास देशात अन्नासाठी रांगा लावण्याची वेळ नजीक येऊन ठेपणार आहे व त्याचा परिणाम देशाच्या सम्पूर्ण अर्थव्यवस्थेला भोगावा लागणार आहे या करिता दांडियात्रेच्या स्मृतीत शेतकरी विरोधी कायदे हटवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सम्पूर्ण स्वातंत्र्यासह नागरिक सत्ता मजबूत करण्यासाठी आज अकोला येथे शेतकरी संघटने तर्फे युवकांची भव्य मोटर सायकल रॅली व सभा सम्पन्न झाली शेतकऱ्यांच्या सम्पूर्ण स्वातंत्र्यासाठी शेतकरी विरोधी कायद्याचे गज तोडल्या शिवाय शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही असा संदेश या रॅली तुन देण्यात आला जिल्हापरिषद कर्मचारी भवन पासून या रॅली ला सुरवात झाली आणि पुढे नेहरू पार्क अशोक वाटिका एसटी स्टँड समोर गांधी जवाहर बागेत जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारारपर्ण करण्यात आले व सभा घेण्यात आली सभे ला श्री अविनाश नाकट जिल्हा प्रमुख शेतकरी संघटना यांनी व विलास ताथोड शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया राज्य प्रमुख व मनोज तायडे दीपक गावंडे यांनी मार्गदर्शन केले
या रॅली मध्ये मोठया संख्येने शेतकरी पुत्र व युवक सहभागी झाले होते शेतकरी संघटना जिंदाबाद शरद जोशी जिंदाबाद च्या घोषणा देऊन रॅली चा समारोप करण्यात आला.यामध्ये डॉ प्रवीण गायगोळ पंकज साबळे प्रशांत गावंडे ,दीपक गावंडे,विनोद नालट घनश्याम दांदळे विजय सुरडकर योगेश थोरात डॉ स्वप्नील ठाकरे गणेश पवार संदीप महल्ले प्रेम गावनडे राहुल भाळतीलक प्रवीण गावंडे शेषराव पवार अक्षय देशमुख माणिक देशमुख गोपाल सावरकर कुनाल नेरकर ऋषिकेश देशमुख अंकित लांडगे शुभम मोरेप्रमोद डेंडवे दिनेश लोहोकार हरिओम जानोरकर अक्षय पाटील पुष्कर देव आशिष ताथोड अभिषेख निस्ताने योगेश राठोड स्रेयश पाटेकर अंकित मोडक अविनाश हडोळे आनंद सरप ज्ञानेश्वर गावंडेआदींचा सहभाग होता.