*ईसरूळच्या प्रकरणावर ना.मधुकरराव कांबळे यांचा सन्मानिय तोडगा >< समाजाने खोट्या प्रचाराला बळी पडू नये - श्री राजेश अहिव*

0
891

वर्धा-

बुलढाणा जिल्ह्यातील ईसरुळ या गावी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काही समाजकंटकांनी उचलून विटंबना केल्याचा संताप राज्यातील समाज बांधवास व्यक्त होऊन जागो-जागी अनेक आंदोलने झालीत काही ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात आल्या.अनेक कार्यकर्त्याची दिशा भूल केली.समाजाचा वाढता रोष व सामाजिक असुरक्षतेची भावना पाहून उपेक्षित दलितांचे राष्ट्रीय नेते ना.मधुकरराव कांबळे (राज्यमंत्री) यांनी स्वतः ईसरुळ या गावी जाऊन संबंधित घटनास्थळाची पाहणी केली.व सर्व पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,गावकरी,घटनेचा आरोप असणाऱ्या धनगर समाजाच्या नेत्यांशी सामंजस्य चर्चा केली. सदर जागा शासकीय असून जगद विख्यात साहित्यिक व समाजाचे आदर्श असलेल्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्याच जागी सन्मानाने बसवून तेथे समाज मंदिर व इतर सोई देण्याची आणि धनगर समाजालाही त्यांच्या सामाजिक उपक्रमाकरीत जागा व समाजमंदिर देण्याची घोषणा करून दोन्ही समाजात समेत घडवून सन्मानिय तोडगा काढला त्यामुळे समाजात आनंद व्यक्त होत आहे.ना.मधूकररावजी कांबळे राज्यमंत्री यांनी राजेश अहिव अध्यक्ष (दलित समता परिषद विदर्भ प्रदेश) तथा माजी संचालक वसंतराव नाईक विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली.त्या कालावधीत समाजबांधवाच्या भावना अनावर झाल्याहोत्या.काही कार्यकत्यांची दिशाभूल करून सामाजिक वातावरण पेटविण्याचा प्रयत्न केला होता.आता समाजाने योग्य दिशे कडे वाटचाल करून समाजाचा सर्वांगीण विकास अफवांवर विश्वास न ठेवता सत्यता पडताळून निर्णय घ्यावा असे आव्हान राजेश अहिव यांनी केले आहे.