तरूण युवक शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय वरदान !

0
1242
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव-हेमंत व्यास:-

तरूण युवक शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय हे आता एक परीपुर्ण शास्त्र बनले आहे.त्याच्या जोडीला पशुपैदास आणि पशुसंवर्धन दुग्धप्रक्रिया, दुग्ध संकलन,व्यवस्थापन व वितरण म्हणजेच विक्रीव्यवस्थापन, पशुखाद्य पैदास आणि त्यावरील उपचार रोगप्रतिबंधक खबरदारीचे उपाय त्याचबरोबर दुग्धव्यवसायासाठी उपयुक्त यंत्रसामुग्री व आवजारे याची निर्मिती ,दुग्धव्यवसायात सहकारीतत्वाचा अवलंब अशा अनेक बाबींचा तरूण युवक शेतकऱ्यासाठी विकास घडवून आणण्याचा प्रयत्न व्यापकस्तरावर होत आहे.ह्या विविधांगी प्रक्रियेत अनेक घटक समाविष्ट आहेत.शासकीय यंत्रणा आहे.तशाच खाजगी व सहकारी उद्योग प्रणाली देखील आहेत.आजमितीस महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिद्न्यासु व उद्योगप्रिय तरूण युवक दुग्धउत्पादक शेतकरी आहेत.शासकिय व निमशासकिया मार्फत अधुनिक तंत्र शेतकऱ्यांच्या गोठ्या पर्यंत माहीती पुस्तकाद्वारे पोहचलेली आहेत.त्यामुळेच युवक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाला अधुनिक तंत्रद्न्यानाची जोड दिली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त करून महाराष्ट्रात धवलक्रांती घडवणाऱ्या दुग्धव्यवसायाने अल्पभुधारक शेतकरी आणि मजुर यांना आर्थिक स्थैर्य मिळवुन दिले आहे.

मानवी व्यवहाराच्या निरनिराळ्या क्षेत्रात सहकारी चळवळीचा अवलंब महाराष्ट्रात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे,तेवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतात अन्य कोणत्याही राज्यात क्वचितच केला असेल सहकार क्षेत्रातील साखर कारखाने,सुत गिरण्या,तेल गिरण्या ,उपसा जलसिंचन योजना,ग्रहनिर्माण संस्था इत्यादी ठळक उदाहरणे सांगता येतील.म्हणुन आपल्या महाराष्ट्र शासनाने तरूण युवक शेतकऱ्यांसाठी गाव पातळी पासुन तालुका आणि जिल्हा स्तरापर्यंत शेतकरी दुग्ध उत्पादकांच्या सहकारी संस्था व त्यांचे दुध संघ स्थापन करण्यास जाणीव पुर्वक उत्तेजन दिले त्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना आखल्या ग्रामीण भागात दारीद्र्य निर्मुलनासाठी उत्पन्नाच्या साधनांचा विकास करण्याच्या हेतुने आणि भुमीहीन शेतमजुर व अल्पभुधारक शेतकरी यांना दुग्धव्यवसाय करता यावा म्हणुन संकरीत गायी वाटप योजना आवश्यक आहे.त्यामुळे गरीब शेतकरी युवक कुटुंबांना रोजगाराचे नविन साधन उपलब्ध होईल त्यामुळे थोड्याका प्रमाणात असेना का पण शेतकऱ्याच्या आत्माहत्या रोखल्या जातील शिवाय तमाम जनतेला निर्भेळ दुध माफक दराने मिळेल मात्र त्यासाठी उत्पादक व ग्राहक यांच्या संयुक्त आंदोलनाच्या माध्यमातुन शासन स्तरावर मोठा दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील शेतमजुर मागासवर्गीय जनता,आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकातील लोक ग्रामीण बेरोजगार ह्यांच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने दुग्धव्यवसाय हा एक परिपुर्ण असा फायदेशीर ठरेल.ह्या व्यवसायासाठी सहकार तत्वावर आणखी करून शेतकऱ्यांना सक्रीय रितीने सहभागी होण्यास प्रवृत्त केले पाहीजे.या गोष्टीचा परिणाम असा दिसेल की दुग्धउत्पादनात लक्षणिय वाढ होईल. अतिरीक्त दुधापासुन लोकांच्या आवडीचे वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ निर्भेळ व माफक दरात अधिकाधीक प्रमाणात निर्माण करून त्याची व्यापक प्रमाणावर विक्री करणे फायदेशीर पर्याय ठरेल.जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो तेंव्हा आपण जगात कोठेही असा आपल्या समोर येते ती सांगली,सातारा,कोल्हापुर पट्ट्यातील ऊस शेती.
सहकाराचे व्यापक जाळे असलेल्या या पट्ट्यात ऊस शेती हा तरूण शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्याय वाटत आला आहे.अलिकडेच तीन चार वर्षापासुन अवकाळी पावसामुळे व पाणी टंचाईमुळे ऊसाला व द्राक्षबागांना भासणारा पाण्याचा तुटवडा त्यातच हुमणी,मावा,करपा इ.किडींचा प्रादुर्भाव व ऊस,द्राक्ष पिकांना हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्याचीच होवु लागली आहे.आणखी काही दिवस असेच चालल्यास ही स्थिती आणखीन गंभीर होईल असे आजचे चित्र आहे.अशा प्रतिकुल परिस्थीतीत शेतकरी पर्यायी पिकांचा विचार करू लागला आहे.जगातील चार महत्वाच्या तृणधान्या पैकी मक्याचा समावेश होतो.शेतकऱ्यांना पशुखाद्य म्हणुनपण मका पीकांचा विचार करण्यास हरकत नाही.शिवाय मक्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प अनेक ठिकाणी कार्यन्वीत झाले आहेत.याचा फायदाही युवक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होईल व शेतकऱ्यांच्या आत्माहत्याचे प्रमाणात घट होवुन शेतकरी सुखी होईल व शेतीही सुजलाम,सुफलाम होण्यास मदत होईल.व शेतकऱ्यांना शेतीत मोठ्या प्रमाणात फायदाच होईल यात शंकाच नाही !!