अरुणोदय मार्केट येथे एक विचित्र अपघात

0
802
Google search engine
Google search engine

कार बांधकामासाठी खणलेल्या खड्यात जाऊन पडली

परळी वैजनाथ: दिपक गित्ते

:परळीतील अरुणोदय मार्केट येथे एक विचित्र अपघात घडला. या अपघातात एक कार बांधकामासाठी खणलेल्या खड्यात जाऊन पडली. झाले असे की, एक कार छोटा हाती आटोला धडकली अन बांधकामासाठी खणलेल्या खड्यात पडली, तर ऑटो अरुणोदय मार्केट मधील एका दुकानाच्या पायऱ्यांना जाऊन धडकला. या अपघातात कारमधील तिघा जणांना किरकोळ दुखापत झाली असून, आजू बाजूला लावलेल्या काही दुचाकींचेही नुकसान झाले आहे.  या अपघातात जखमींबाबत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल….

आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातातील कार क्र. एम.एच.06 ए. बी.1365 ही भरधाव वेगात छोटा हाती क्र. एम.एच.44- 6846 या ऑटो ला धडकली आणि रस्त्याच्या लगत असलेल्या खड्यात जाऊन पडली. सुदैवाने या कारमध्ये असलेल्या तिघे जण बचावले आहेत. हा अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेतील अपघातग्रस्त ऑटो हा विजेच्या खांबाच्या जवळ असलेल्या पायऱ्यांनी धडकल्याने खैर झाली, अन्यथा या अपघाताला गंभीर वळण लागले असते. खड्यात पडलेली कार रात्री उशिरा क्रेन च्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.