आकोटात भव्य शोभायाञेने महात्मा जोतिबा फुलेंना अभिवादन

0
1304
Google search engine
Google search engine

आकोट-/ संतोष विणके :-

महात्मा जोतिबा फुले यांची १९१ वा जयंती उत्सव आकोट शहरात विविध उपक्रम राबवुन भव्य दिव्य पणे साजरा करण्यात आला.उत्सवा निमित्त संध्याकाळी नंदीपेठेतील नंदकेश्वर मंदीर येथुन भव्य शोभायाञा काढण्यात आली.

शोभायाञेत आकर्षक पणे सजवलेल्या रथांवर महात्मा फुलेंची वेशभुषा केलेले बालक तसेच महात्मा फुलेंचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता.शोभायाञेचे ठीकठीकाणी भव्य आतिषबाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शोभायाञा सोमवार वेस येथील फुले चौकात पोहचताच याठीकाणी म.फुलेंच्या पुतळ्याचे हार फुलांनी पुजन करण्यात आले.शोभायाञा शनवारा ,याञा चौक ,सोनु चौक,जयस्तंभ चौक ,पटेल चौक,मार्गे फुले चौक येथे पोहचुन संपली.शोभायाञे दरम्यान मार्गावर ठीकठीकाणी थंड पाणी ,सरबत वाटप करण्यात आले.शोभायाञा जयस्तंभ जवळ मार्गस्थ असतांना अचानक धुंआँधार पावसाने हजेरी लावली.माञ शोभायाञेतील तरुण युवक कार्यकर्त्यांचा उत्साह जल्लोष भर पावसातही कायम होता.शोभायाञेत मोठ्या संख्येने महीला पुरुष आबालवृद्ध सहभागी होते.तत्पुर्वी सकाळी शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने फुले चौकातील जोतिबांच्या पुतळ्याचे हार फुलांनी पुजन करण्यात आले.तर दुपारी भव्य मोटार सायकल रॕली पार पडली.जयंती उत्सवा निमित्य रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते.