क्रांतिसूर्य प्रतिष्ठाण अडगाव बु शिवाजी नगर तर्फे म.जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

0
887

आकोट / संतोष विनके :-

महात्मा जोतिबा फुले यांची जयंती दर वर्षी प्रमाणे शिवाजी नगर येथे क्रांती सूर्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात जय जवान! जय किसान ! या घोषणेला अनुसरून गावातील सैन्यात असणाऱ्या मुलांच्या परिवारातील सदस्यांचे सत्कार करण्यात आले .

सोबतच किसान म्हणून शेतकरी संघटना तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांचा सत्कार गावातील शेतकरी बांधावा तर्फे क्रांतीसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन निमकर्डे ,उपाध्यक्ष गजानन राखोंडे , पोलीस स्टेशन हिवरखेड चे ठाणेदार विकास देवरे यांचे हस्ते करण्यात आला .सभेला लक्ष्मीकांत कौठकर यांनी संबोधित करताना मा. जोतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ “शेतकऱ्यांचा आसूड”मधे जी शेतकऱयांची परिस्थिती चा उल्लेख केला आहे त्यात काही बदल झालेला नाही .अठराशे च्या दशकात ही शेतकऱ्यांचे शोषण होत होते तर आजही शोषण सुरू आहे फरक एवढा आहे शोषण करणारे बदलत आहे .ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या शोषणावर उभी असल्याने मा. जोतिबा फुले चे विचारांचा प्रसार महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न कडे सरकार चे लक्ष वेधण्याकरिता युवा वर्गाने समोर यावे अस मत वक्त केले .व्याख्याना मधे कु. मोनिका काळे यांनी पुस्तके वाचून युवा वर्गाने थोर महापुरुषांचा आदर्श घ्यावा अस मत वक्त केले .या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे नितीन निमकर्डे, गजानन राखोंडे यांनी केले होते. सूत्र संचालन नंदकिशोर अढाऊ यांनी केले .आभार प्रदर्शन मयुर निमकर्डे, गोपाल निमकर्डे,दिनेश गिर्हे, निलेश नेमाडे,प्रकाश आसरे, दिनेश देवुळलकार यांनी केले कार्यक्रमास पोलीस स्टेशन हिवरखेड तर्फे दीपक गवई तसेच हर्षल बोदडे, मयुर निमकर्डे, धीरज खिरोडकार, आशिष निमकर्डे, शाम राऊत, प्रशांत निमकर्डे, हरिभाऊ निमकर्डे,पंकज खिरोडकार,अमोल रहाटे,प्रवीण निमकर्डे,उमेश राखोंडे, व इतर गावकरी उपस्थित होते .