पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले कुस्तीपटू राहूल आवारेच अभिनंदन

534

पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले कुस्तीपटू राहूल आवारेच अभिनंदन

राष्ट्रकुल स्पर्धेत बीड जिल्हयाची मान अभिमानान उंचावली

प्रतिनिधी: दिपक गित्ते

मुंबई दि. १२ – राष्ट्रकुल स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करणारा कुस्तीपटू राहूल आवारे याचं राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केलं आहे. राहूलच्या कामिरीमुळे बीड जिल्हयाची मान अभिमानान उंचावली असल्याचे त्या म्हणाल्या.

कुस्तीपटू राहूल आवारे हा बीड जिल्हयातील पाटोद्याचा रहिवासी आहे. सिडनी येथे सुरू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरूषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत राहूलने कॅनडाच्या खेळाडूला चीतपट करत सुवर्णपदकाची कमाई केली. राहूल खूप जिद्दीने लढला. महाराष्ट्रा बरोबरच बीड जिल्हयाची मान त्याने उंचावली, या कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून त्याला ५० लाख रुपये इनाम मिळणार आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले यश खरोखर कौतुकास्पद आहे अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात