रीद्धपुर येथील पाईप लाइन चे काम तातडीने पूर्ण करा:- जी.प उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे >< जलसंधारण समितीचीची आढावा बैठक

0
702

अमरावती –

रिद्धपुर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडया अंतर्गत गावातील 9 किमिची रस्ते बांधकामाची तरतूद आहे अश्या परिस्थितित मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत गावात पाइप लाईनची कामे सुद्धा प्रस्तावित असल्याने अधिकार्याच्या संथ गतीच्या कारभारामुळ येथील पाइप लाइनचे काम सुरु न झाल्याने रस्त्यांचे बांधकाम झाल्यावर जर पाइप लाइन चे काम सुरु झाले तर चांगले रस्ते फोडले जाऊ शकतात त्यामुळे उपाध्यक्ष श्री दत्ता ढोमने यांनी जलसंधारण समितीच्या आढावा बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत येथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी सुचविले. अध्यक्ष श्री नितिन गोंडाने,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके,बांधकाम सभापती जयंत देशमुख,आरोग्य सभापती बळवंत वानखडे, समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे आदि यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत रिद्धपुर गावात पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन टाकण्याकरिता 9 कोटी 32 लाख रुपयांचा निधि मंजूर झाला असून सुद्धा या कामाला अद्यापही गती मिळाली नसल्याने गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी अधिकार्याना धारेवर धरले रिद्धपुर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत गावातील अंर्तगत 9 किमी ची रस्त्याची कामे प्रस्तावित आहे. त्याकरिता 22 कोटि 32 लाख इतका निधि मंजूर झालेला आहे अश्या परिस्थितिती रस्त्याची कामें पाइप लाइन टाकण्यापूर्वी जर झाले तर चांगले रस्ते पाइप लाइनसाठी फोडले जावू शकतात त्यामुळे शासनाच्या निधि हा व्यर्थ जावू शकतो अश्या परिस्थित रस्त्याच्या पूर्वी पाइप लाइनची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना प्रशासनाला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी गुरुवारी झालेल्या जलसंधारण समितीच्या बैठकीत दिल्या.