नरखेड तालुक्यातील ६५ गावांमध्ये वॉटर कप स्पर्धेचे आले तुफान – संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे नरखेड तालुक्यावर लक्ष

0
1003
Google search engine
Google search engine

हजारो गावकरी श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी लागली कामाला

नरखेड तालुक्यात वॉटर कप स्पर्धेची श्रमदानाच्या माध्यमातून सुरुवात

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

वॉटर कप स्पर्धेसाठी नरखेड तालुक्यांतिल ६५ गावांमध्ये सध्या जलसंधारणासाठी श्रमदानाने वेग घेतला आहे. तब्बल दहा हजारांवर नागरिक श्रमदान करत आहे . मुळातच वॉटर कप ही स्पर्धा आपल्या गावातील पाण्याची व्यवस्था आपणच निर्माण करावी, या उद्देशाने आहे. लोकवर्गणी व श्रमदान हे या स्पर्धेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ६५ गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत. या नागरिकांना आता शहरी भागातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसह नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची जोड मिळाली, तर जलसंधारणाची ही चळवळ अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा नरखेड तालुक्यातील गावकरी व्यक्त करीत आहे .

वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने नरखेड तालुक्यामध्ये निर्माण झालेले वातावरण, लोकांचा प्रतिसाद व अडचणी सोडविण्या संदर्भात वॉटर कपचे , प्रशिक्षणार्थी , तालुका समन्वयक, ग्रामस्थ व अधिकारी सहभागी होऊन लोकसहभागातून ही लोकचळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे .

जलसंधारणाच्या या चळवळीमुळे गावागावांत मनसंधारणही होत असल्याचे प्रत्यंतर या माध्यमातून समोर आले.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा उत्साहात सुरू आहे आपल्या गावात पडणारे पाणी आपणच मुरवायचे, हे मूळ ध्येय या स्पर्धेचे आहे. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व प्रशासन प्रत्यक्ष श्रमदानामध्ये सहभागी होत आहे, ग्रामस्थांना प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे आगामी काळात यामध्ये स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेऊन श्रमदान करण्याच्या तयारीला नरखेड तालुक्यातील ६५ गावे तयारीला लागले आहे .

वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला ८ तारखे पासून सुरुवात झाली असून, नरखेड तालुक्यातील ६५ गावांत तुफान आलं आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे.

वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू झाली आहे. हे काम ४५ दिवस चालणार असून, दि. २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुके उतरले आहेत.

नागपूर जिल्ह्यातिल नरखेड तालुक्याचा समावेश यावर्षी स्पर्धेमध्ये केला आहे . यावर्षी स्पर्धेतील गावांची संख्या वाढली असून, नरखेड तालुक्यातील ६५ गावांचा समावेश आहे. सध्या वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावांत जनजागृती, व कामाचे नियोजन करून स्पर्धेच्या कामाला सुरुवात करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी नरखेड तालुक्यायील ६५ गावातील नागरिकस्पर्धेच्या कामासाठी सज्ज झाले आहे.

वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा यावर्षी सुरू झाला आहे. या स्पर्धेत नरखेड तालुका दुष्काळमुक्तीसाठी आघाडीवर आहे नरखेड तालुक्यामध्ये वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून या स्पर्धेच्या कामांना ७ तारखेला रात्री १२ वाजता पासूनच स्पर्धेच्या कामाला सुरुवात झाली आहे त्याकरिता नरखेड तालुक्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नरखेड तालुक्यामध्ये प्रत्येक गाव पाणीदार करण्यासाठी जिल्हा प्रशासन सुद्धा या वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कर्वे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कादंबरी बलकवडे , यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासन व तहसीलदार जयवंत पाटील , गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे , वन परिक्षेत्र अधिकारी , कृषी अधिकारी यांच्यासह पाणी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक अतुल काळे , तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे , यांच्यासह संपूर्ण पाणी फाउंडेशन टीम , तालुका प्रशासन , तसेच विविध संस्था, राजकीय मंडळी , युवक व युवती मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन श्रमदान करून वॉटर कप स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे नरखेड तालुक्यातील तब्बल ६५ गावांनी सहभाग घेतला आहे असून स्पर्धेच्या माध्यमातून लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांचे मानसंधारण झाल्याचे चित्र नरखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे . नरखेड तालुक्यातील ६५ गावे गट-तट विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र आली आहेत हे विशेष .