मंगरुळपीर पं.स.उपसभापतीसह एक ACB विभागाच्या जाळ्यात..!

0
870

प्रतिनिधी-सचिन बडे :-

मंगरुळपीर- तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने मंजुर असलेल्या सहस्ञ सिंचन विहीरीची वर्क आॅर्डर काढुन देनेसाठी आरोपी ईतर लोकसेवक सुभाष शंकरराव शिंदे वय -५० ऊपसभापती पं.स.मंगरुळपीर रा.गोगरी ता.मंगरुळपीर आणी दिलिप महादेव अवगन वय- ५२ खाजगी ईसम रा.पिंप्री अवगण ता.मंगरुळपीर यांना ६००० रुपये लाच स्विकालतांना एसिबी पथकाने पकडले असुन गुन्हे दाखल करन्यात आले आहे.
तक्रारदाराने तक्रार दिली की,त्यांचे भावाच्या नावाने सहस्ञ सिंचन विहीर मंजुर असुन सदर विहीरीची वर्क आॅर्डर काढुन देणेसाठी आरोपी ईतर लोकसेवक पं.स.ऊपसभापती सुभाष शिंदे यांनी १०००० रुपयाची मागणी केली आहे.सदर तक्रारीवरुन आज दिनांक १२/०४/२०१८ रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता दरम्यान इलोसे सुभाष शंकरराव शिंदे यांनी तडजोडीअंती ६००० रु.लाचेची मागणी केली .पंचायत समिती मंगरुळपीर येथे सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार ऊपसभापती शिंदे यांचेकडे गेला असता शिंदे यांनी लाचेची रक्कम ६००० रु.दिलिप महादेव अवगण(खाजगी व्यक्ती)यांचेकडे देन्यास सांगीतले.आरोपी क्र.२ यांनी लाच स्विकारली.आरोपी इलोसे सुभाष शिंदे व आरोपी दिलिप अवगण यांना ताब्यात घेवून लाचेची रक्कम हस्तगत करन्यात आली.त्यांचे विरुध्द कलम ७,१२,१३(१)(ड) सह कलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करन्याची कारवाई सुरु आहे.सदर कारवाई मा.पोलिस अधिक्षक श्री.श्रिकांत धिवरे,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती,पोलिस ऊपअधिक्षक श्रि.आर.व्ही.गांगुर्डे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक निवृत्ती बोराडे व स्टाफ,पो.हवा.भगवान गावंडे,पो.ना.नितिन टवलारकर,अरविंद राठोड,विनोद अवगळे ला.प्र.वि. वाशिम यांनी केली आहे.