बिलाल गोवर्धन नेहरकर याच्या फिर्यादीवरून कमलाकर कोपले यांच्यासहित ९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

0
955
Google search engine
Google search engine

कोपले यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा आरोपी आकाश उर्फ बिलाल गोवर्धन नेहरकर याच्या फिर्यादीवरून कमलाकर कोपले यांच्यासहित ९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे

:नितीन ढाकणे

कोपले यांच्यावर दि. ९ एप्रिल रोजी प्राणघातक हल्ल्याची दुसरी बाजू समोर आली असून हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी आकाश उर्फ बिलाल गोवर्धन नेहरकर याच्या फिर्यादीवरून कमलाकर कोपले यांच्यासहित ९ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आकाश उर्फ बिलाल नेहरकर याने फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्याचा मित्र बशीर शेख याचा फोन आल्याने तो कोपले यांच्या श्रीजित लॉजवर गेला. तिथे मित्रांसोबत बोलत असताना त्यांच्यात आपसात वाद झाला. यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक, वेटर आणि अन्य एकाने मध्यस्थी करून वाद मिटविला. त्यानंतर रात्री ११.५० वाजता बशीर आकाशकडे आला आणि दोन मित्रांना कोपले यांच्या काही लोकांनी पेट्रोल पंपावर धरून ठेवले असल्याचे सांगितले. त्यामुळे मध्यरात्री १ वाजता आकाश त्याचा मित्र दानिश याच्यासोबत पेट्रोल पंपावर गेला. तिथे कमलाकर कोपले, विजय कोपले, रामेश्वर कोपले, शरद कोपले, राहुल कोपले, रोहन कोपले, सनी कोपले आणि अनोळखी दोघे जण लाकडी दंडुके आणि लोखंडी रॉड घेऊन उभे होते. यावेळी विजय कोपले यांनी आकाशला शिवीगाळ केली आणि नंतर सर्व आरोपींनी मिळून त्याला लाकडी दंडुके आणि लोखंडी रॉडच्या साह्याने बेदम मारहाण केली असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून वरील ९ आरोपींवर कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून नंतर ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

#कोपले हल्ला प्रकरणातील आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी : कमलाकर कोपले यांच्यावरील हल्ला प्रकरणी आकाश नेहरकर आणि त्याच्या पाच साथीदारांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यात ॲट्रासिटीचे कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी सहापैकी आकाश, अस्लम आणि सुनील मुंडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास आता सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे करत आहेत.