*आगग्रस्थ पारधी बेड्यातील कुटुंबाना रेड क्रॉस सोसायटीने केले संसारोपयोगी साहित्याचे वाटप…*

0
596

आकोट / संतोष विनके:- –

गेल्या आठवड्यात पोपट्खेड रस्त्यावरील गजानन महाराज विहीर संस्थान कडे जाणाऱ्या मार्गावर पारधी बेड्याला आग लागुन पारधी समाजाच्या लोकांच्या पाच ते सहा झोपड्या अचानकपणे लागलेल्या आगीत संपूर्णतः जळून खाक झाल्या होत्या.त्या झोपड्यांमध्ये असलेले त्यांचे संसारोपयोगी साहित्य व अन्न धान्य कपड्यालत्यासह जळून खाक झाले होते.या सर्व लोकांना आज रेड क्रॉस सोसायटीच्या अकोला जिल्हा शाखेने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून समाजातील असहाय लोकांप्रति असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

आकोट येथील रेडक्रॉसचे कार्यकर्ते देशपांडे मेडिकलचे संचालक राजेश(छोटुभाऊ) देशपांडे यांनी या आगीत पारधी लोकांच्या झालेल्या नुकसानाची माहिती जिल्हा सचिव बच्छेर यांना देताच त्यांनी तातडीने या कुटुंबांसाठी संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी पाठवून रेडक्रॉसची सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.

या आगीत नुकसान झालेल्या 1)अरुण सिकंदर घोसले,2)आयनूर जवाहरलाल घोसले,3)प्रभाबाई मनोहरलाल घोसले,4) तुंगया परतेकी पवार,व 5) चमकबाई शंकर पवार तर्फे ज्ञानेश्वर शंकर पवार यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप आज राजेश(छोटुभाऊ) देशपांडे,अकोटचे नायब तहसीलदार राजेश गुरव व पत्रकार मोहन पांडे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मंडळ अधिकारी ए.डब्लू.ओइम्बे , तलाठी ए.आर.चव्हाण व परिसरातील नागरिक उपस्थित होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी ही स्वातंत्र्य पूर्व काळापासून स्थापन झालेली एक सामाजिक संस्था असून ती वैद्यकीय सेवा देण्यात अग्रेसर आहे.मग ते युद्ध भूमीवरील सैनिक असोत वा नैसर्गिक आपत्तीत सापडलेले नागरिक. देशात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तीत रेड क्रॉस सोसायटीने मदत कार्यात महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. जिल्हाधिकारी हे या संस्थेचे जिल्हा अध्यक्ष आहेत तर प्रभजीतसिंग बच्छेर हे सचिव आहेत.रेडक्राॕस सोसायटीच्या मदतीचे सर्वञ कौतुक होत आहे