न्यायाधीशांच्या घरी चोरी

0
633
Google search engine
Google search engine

 

बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी टीव्ही लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बीड: नितीन ढाकणे

अंबाजोगाई : शहरातील नव्याने विकसित झालेल्या चनई शिवारातील नाथ व्हॅली भागातून न्या. दत्ता झाटे यांचे बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी टीव्ही लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्या न्या. दत्ता झाटे हे सहकुटुंब नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास असल्याने त्यांचे सदरील घर बंद असते. त्याची एक चावी त्यांचे मेहुणे नवनाथ गोमदे यांच्याकडे असते. गोमदे अधूनमधून जाऊन घराची पाहणी करत असतात. दि. ७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता आतील टीव्ही अंदाजे २३ हजार किंमत, चोरीस गेल्याचे आढळून आले. गोमदे यांनी ताबडतोब याची खबर न्या. दत्ता झाटे यांना दिली. त्यांनतर त्यांनी अंबाजोगाई पोलिसात धाव घेत वरील आशयाची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर कलम ३८०,४५४,४५७ अन्वये अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.