१९ हजार रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त

0
763
Google search engine
Google search engine

बीड: नितीन ढाकणे

परळी : परळी-अंबाजोगाई रोडवरील तीन हॉटेल ढाबामध्ये परळी पोलिसांनी छापा टाकुन १९ हजार रुपये किंमतीचे विदेशी दारु जप्त केली. याप्रकरणी हॉटेल मधील तिघा जणांवर गुन्हे नोंदवुन  त्यांना अटक केली आहे. तर शहरातील उड्डाणपुला खाली सात लिटर देशी दारु पकडली. याठिकाणी बेकादेशीर रित्या दारुची विक्री होत असल्याची कुण कुण लागल्याने पोलिसांनी  छापा टाकुन ही कारवाई केली. यामुळे हॉटेल चालकामध्ये शुक्रवारी खळबळ उडाली व पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांचे  कौतुक केले. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत मानकर, संभाजी नगर पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्या सुचनेवरुन परळीचे पोलिस उपनिरीक्षक शिंदे, जमादार बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड, दत्ता गित्ते, रवी पवार यांनी शुक्रवारी दुपारी  धाड टाकुन दारु जप्त केली.अंबाजोगाई रोडवरील हॉटेल वरद, उदयराज व सारंग या तीन हॉटेलमधील व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ हजार रुपयाची बेकादशीर रित्या दारुची विक्री करीत असतांना पकडण्यात आले. सारंग येथे ३८४  रुपयांची, हॉटेल वरद येथे ६,१३४ रुपयांची तर उदयराज येथे १२  हजार ५६० रुपयांची विदेशी दारु पोलिसांनी पकडली. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर व संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने शुक्रवारी दुपारी परळी-अंबाजोगाई मार्गावरील तीन हॉटेल ढाब्यावर १९ हजार रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त केली. बेकायदेशिर रित्या विदेशी दारु विक्री प्रकरणी हॉटेलच्या कर्मचार्‍यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीघा जणांना अटक केली आहे.