चांदुर बाजार तालुक्यातील अनेक गावानं महात्मा गांधी तंटामुक्त समिती चा विसर

0
1105
Google search engine
Google search engine

👉🏻गाव पातळीवर तंटामुक्त समिती फक्त कागदावरच,आणि बक्षीस करिता,

अजून पर्यंत योग्य तशी अमलबजावणी नाही

👉🏻तालुक्यातील अनेक गावामध्ये अवैध धंदे, दारू,जुगार प्रमाणात वाढ

चांदुर बाजार शहर प्रतिनिधी बादल डकरे
—————————–
न्यायालयीन कामकाज यावर तणाव वाढू नये.त्यामुळे गाव पातळीवर निर्माण होणारे तंटे कमी कसे करता येणार तसेच सामाजिक सलोखा टिकून राहावं या करिता राज्य सरकार यांनी ग्राम पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करण्याचं निर्णय घेतले.मात्र या समिती अध्यक्ष या याचे ज्ञान अवगत नसल्यांने तालुक्यातील गावा गावात अवैध धंद्यांनी कळस गाठला असून याकडे पोलीस प्रशासन आणि तंटामुक्ती अध्यक्ष याचे हेतू पुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता गावा गावातील नागरिकडून होत असताना दिसून येत आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील अनेक गावामध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी सुरुवाती च्या काळात चांगली कामगिरी करून पुरस्कार प्राप्त केले होते.मात्र मागील काही कालावधी पासून या चळवळी ला ग्रहण लागले असल्याचे चित्र आहे.त्यामुळे गाव पातळीवर वरील तंटामुक्ती समिती अध्यक्ष नावालाच राहिले आहेत.

तालुक्यातील अनेक तंटे हे चारही पोलीस स्टेशन पर्यंत पोहचत आहे.त्यामुळे तंटामुक्ती समिती अध्यक्ष याना योग्य अश्या तालुकास्तरीय  मार्गदर्शन ची गरज तर नाही ना?अशा ही प्रश्न विचारला जात आहे.तर काही तंटा गावात झाला तर तंटा मुक्ती समिती अध्यक्ष मला काहीच माहिती नसल्याची भूमिका घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
बॉक्स

या सर्व वर मार्गदर्शन साठी तालुका स्तरावर  बैठका होत नाही.या साठी तालुका वरील तंटामुक्ती समिती अध्यक्ष ,नियंत्रक यांनी या समिती याना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे असताना याकडे सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

दुसरा बॉक्स
या सर्व मुळे ग्राम पातळीवर मोठ्या प्रमाणात देशी दारू,गावठी दारू,अवैध वाळू तस्करी या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत आल्याचे दिसून येत आहे.तर तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुळाची गणपती ची भूमिका तर घेत नाही आहे ना.अशी चर्चा चांगलीच रंगात आली आहे.