🏅 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांंचा सिलसिला कायम

513

🏅 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांंचा सिलसिला कायम

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दहाव्या दिवशी बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सिंगच्या 48 किलो वजनी गटात आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

दरम्यान गौरव सोलंकीने देखील बॉक्सिंगच्या 52 किलो वजनी गटात तर नेमबाज संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. भारताच्या खात्यात आता 46 पदके जमा झाली असून, यामध्ये 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.

 

जाहिरात