*मिरवणुक मार्गावर स्वच्छता राबवुन डॉ बाबासाहेबांना अभिवादन*

0
689

आकोट / संतोष विणके –

डॉ. बाबासाहब आंबेडकर जयंती निमित्य अकोटात दरवर्षी भव्य मिरवणयाञेची निघते.या मिरवणुक मार्गावर कचरा संकलन करुन स्वच्छता मोहीम राबवुन बाबासाहेबांना आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीतील सहभागी बांधवांसाठी मिरवणुक मार्गावर ठीकठीकाणी थंड पाणी, चने पोह्यांचं वाटप करण्यात येते. यात गोळा होणारा कचरा एकञ करत श्रमदानातुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले.संध्याकाळी सुरु झालेल्या मिरवणुकी मागे एक स्वच्छता गाड़ी या उपक्रमासाठी ठेवण्यात आली होती.

मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर होणारा कचरा या गाडीत उचलून टाकत बाबासाहेबांना श्रमदानातुन स्वच्छता मोहीम राबवत अनोखी मानवंदना देण्यात आली.या उपक्रमाला नागरीकांसह अनेकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमात मिरवणुक मार्गावर एक ट्रॕक्टर ट्रॉली पेक्षा जास्त कचरा संकलन करुन स्वच्छता राखण्यात आली. मोहीमेचा समारोप हा मिरवणुक मार्गावर सोनु चौकात राञी 10 वा करण्यात आला.या समाज उपयोगी उपक्रमात भुषण पर्वतकर, नैमिष सेजपाल, रितेश सेदानी, संजय शेगोकार, राहुल पुंडकर, विकास पींपळे, चंदन चंडालिया, शरद सूर्यवंशी, शारदा पर्वतकर, कादंबरी पर्वतकर व दिव्यांग बालक ओम यांनी श्रमदान करुन बाबासाहेबांची जयंती समाजभान जपत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली रस्ता व गाव स्वच्छता राबवुन केलेल्या या अनोख्या मानवंदनेचं सगळ्यांनी जोरदार स्वागत केले.