ढोले आणि माथुरकर परिवार यांचा उपक्रम

0
752

साखरपुडा निमित्त विध्यार्थी याना जलपत्राचे वाटप

ढोले आणि माथुरकर परिवार यांचा उत्कृष्ट असा उपक्रम

चांदुर बाजार:-

समाजामध्ये जगात असताना त्या समाजाप्रती आपले काही देने लागत यांची जाणीव हे मानव जातीला असणे आवश्यक आहे.अशी एक समाज प्रति जाणीव ठेवत चांदुर बाजार तालुक्यांतील शिरजगाव कसबा येथील रहिवासी संदीप ढोले आणि अंजली माधुरकर यांनी आपल्या दिनांक 11 एप्रिल ला साखरपुडा निमित्त श्रीमती गंगाबाई गणेस्कर विद्यालयात जलपत्राचे वाटप केले आहे.त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून स्वागत होते आहे.
संदीप ढोले हे वृत्तपत्र चे काम करीत असून त्यांची भूमाता नावाची एक सामाजिक संस्था आहे मागील 2 ते 3 वर्षा पासून ते उन्हाळमध्ये पक्षी यांच्या करीत दनापनी ही चळवळ आपल्या स संस्थे मार्फत चालवीत आहे.याचाच वारसा पुढे नेण्याकरिता त्यांनी आपल्या साखर पुड्या निमित्त देखील जलपत्राचे वाटप केले.
11 एप्रिल हा महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती असल्याने प्रथमतः विद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आणि त्यानंतर विध्यार्थी याना जलपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळे विद्यालयाचे व्यवस्थापक देवानद थेलकर,मुख्याध्यापक भोंगे सर,इतर शिक्षक आणि विध्यार्थी उपस्थित होते.