धक्कादायक – पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू

839

आमदार राजेंद्र नजरधने यांनी रुग्णालयात जखमींची केली विचारपूस

यवतमाळ : अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये आज चौघांचा जीव घेतला आहे. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमीही झाले आहेत. स्थानिक महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना आहे

यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं प्रभाकर जाधव, पंडित हरणे, अनिल सरगुळे आणि लक्ष्मण चोपडे अशी आहेत. तर जितेंद्र सुरदूसे, विशाल सुरकळे आणि कैलास सुरो यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे.

आमदार राजेंद्र नजरधने यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. तर, दुसरीकडे बोरी अरब गावात वीज पडून ७ शेळ्या ठार झाल्या आहेत.

जाहिरात
Previous articleअवकाळी पावसामुळे माधान येथील शेतकरी साहेबरावजी भगत यांच्या गाई चा मृत्यू
Next articleआता तडोळी गावात तुफान आलया