★मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कडून सेमाडोह आग ग्रस्तांना मदत★

0
1095
Google search engine
Google search engine

सेमाडोह:-

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह गावात आग लागून सुमारे ४० कुटुंबे बेघर झाली होती,घटना घडलेल्या दिवसापासून कुटुंबे उघड्यावर राहत होती.अगदी नट सम्राट मधल्या “कुणी घर देता का घर” या डायलॉगची आठवण यावी अशी अवस्था झाली होती ही गोष्ट मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक श्री.एम.एस.रेड्डी याना समजताच त्यांनी तात्काळ आग ग्रस्तांना मदत म्हणून प्रति कुटुंब २० सागवान व बांबूच्या पोलचे वाटप केले.यामध्ये एकूण ४१ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मा खासदार श्री.आनंदरावजी अडसुळ,श्री.दिलीप कापषिकर, सिपना वन्यजीव विभागाचे सहा वनसंरक्षक श्री.तोरो, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. भैलूमे,जि. प.सदस्यां सौ.काकड व सर्व कर्मचारी उपस्थित होते.व्याघ्र प्रकल्पकडून मिळालेल्या मदतीमुळे आता आग ग्रस्तांना आपले हक्काचे घर उभारता येणार आहे.