*करवीर पिठ शंकाराचार्य श्री विद्यानृसिंह स्वामिंच्या हस्ते कळस स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा*

0
727
Google search engine
Google search engine

अकोट / संतोष विणके:-

श्री राम मंदिर संस्थान शनवारा अकोट येथे दि.२०एप्रिल ते २२ एप्रिल रोजी नुतन कळस स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा प.पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री विघानृसिंह स्वामी महाराज करवीर पिठ कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
दिनांक २० ला सकाळी ८ते १२ श्री गणेश पुजन, देवता स्थापना,अग्नीस्यापना, मुर्ति,जलाधिवास
होमहवन प्रारंभ ,तसेच
रात्रौ ८ ते ९.३० प्रवचन हभप श्रीराम गदाधर शास्त्री करतील. (श्रीराम जयराम जय जय राम) मंत्र जपावर…
दिनांक २१ला न्यासविधी,घान्यधिवास
शय्याधिवास
रात्रौ ७ ते ९ किर्तन सेवा हभप सुनिल महाराज लाजुलकर , नांदुरा तर
रात्रौ ९ ते १० प.पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री विघानृसिंह स्वामी महाराज, कोल्हापूर हे उद्बोधन करतील.
दिनांक २२ला सकाळी ७ ते ८ कळस अराहोण प्राणप्रतिष्ठा सोहळा प.पू जगद्गुरु शंकराचार्य श्री विघानृसिंह स्वामी महाराज करवीर यांच्या शुभहस्ते होईल.
सकाळी १० ते ११ संत संमेलन व आशिर्वाद वचन प.पू जितेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत प.पू जगद्गुरु शंकराचार्य श्री विघानृसिंह स्वामी महाराज करवीर कोल्हापूर,प.पू भादोलकर महाराज भादोला,प.पू दत्त महाराज कुळकर्णी, अकोला, हभप सचिनची देव महाराज शेंदूरजना बाजार,प.पू.आप्पा महाराज देव तेल्हारा, हभप श्रीकृष्ण महाराज बोडखे हभप श्रीराम गदाधर शास्त्री अकोला यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला विघ्दान व संत मंडळीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभणार आहे. सर्व भक्तांनी वरील कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण आणि करबध्द प्रार्थना.व आवाहन श्रीराम मंदिर संस्थान शनवारा अकोट यांनी केले आहे.