*अकोट शहर पोलीसांच्या जुगारांवर धाडी- जुगार साहीत्यासह नगदी माल जप्त*

0
733
Google search engine
Google search engine

आकोट /संतोष विनके :-

अकोट शहर पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार चालविणार्यावर धाडी टाकून एकूण 12 जुगारीं विरुद्ध कारवाई करत त्यांचे कडुन जुगार साहित्य व नगदी 4080/- रू चा माल जप्त केला आहे. पोलीस सुञांनुसार दिनांक 16 /04/2018 रोजी अकोट शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन आठवडी बाजार अकोट येथे जुगार रेड केली . तेथे वरली च्या आकड्यावर जुगार खेळतांना ६ आरोपींना रंगे हात पकडुन त्यांचे कडुन जुगार साहित्य व नगदी 1590/- रुपये जप्त केले. यावरुन आरोपीं विरुध्द अकोट शहर पो स्टे.येथे अप नं 150/ 18 कलम 12 मु .जु .का. सह कलम 109 भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत जिजामाता चौक अकोट येथे वरली मटक्याचे आकड्यावर हारजितचा जुगार खेळतांना रेड केली असता ४ जुगाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांचे कडून जुगार साहित्य व नगदी 2490 /- रुपये जप्त केले. आरोपीं विरुद्ध पो स्टे ला अप नं 151/ 18 कलम 12 मुजुका सह कलम 109 भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर दोन्ही घटनेतील जुगार चालवणारे मालक हे फरार आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकचे पो उप निरिक्षक आशिष शिंदे पोहेका संजय घायल राकेश राठी सुलतान पठाण गोपाल अघडते विजय सोळंके यांनी केली.