नांदेड येथे काँग्रेसचे 19 एप्रिल गुरूवार रोजी मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबीर

0
838

मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबीरास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – राजकिशोर मोदी यांचे आवाहन

बीड: नितीन ढाकणे: ”मिशन 2019”:प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड येथे गुरूवार 19 एप्रिल रोजी काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे या शिबीरात बीड जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

याविषयी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राजकिशोर मोदी यांनी नमुद केले की,गुरूवार दि.19 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या दोन सत्रात कार्यक्रम होणार असून सकाळचे सत्र हे केवळ निमंत्रितांसाठीच राहणार आहे.पहिल्या सत्रातील मराठवाडास्तरीय शिबीरास सकाळी 10 वाजता येथील भक्ती लॉन्समध्ये सुरूवात होईल.हे शिबीर राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या शिबीरास अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश, राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिनजी पायलट, विरोधी पक्षनेते राधाकृष्णजी विखे पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराजजी चव्हाण,अ.भा.काँग्रेस कमिटीचे चिटणीस खा.राजीवजी सातव,ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,माजी मंत्री आ.नसीमजी खान, आ.वर्षाताई गायकवाड, आ.यशोमतीताई ठाकूर,
आ.दिलीपरावजी देशमुख,आ.अमितजी देशमुख,आ.बसवराज पाटील मुरुमकर, आ.अब्दुलजी सत्तार, आ.मधुकरराव चव्हाण, आ.हर्षवर्धनजी सपकाळ आदिंची उपस्थिती राहणार आहे. भक्ती लॉन्स,मालेगाव रोड,तरोडा (खुर्द) नांदेड येथे होणारे पदाधिकार्‍यांचे शिबीर हे केवळ निमंत्रितांसाठीच असून मराठवाड्यातील अ.भा.काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी,ब्लॉक अध्यक्ष, महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका, नगरपंचायती,कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाना,मजूर फेडरेशन,खरेदी विक्री संघ यांचे सर्व पदाधिकारी,सदस्य आणि संचालक त्यासोबतच विविध फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष व राज्यपातळीवरील पदाधिकारी हे या मराठवाडास्तरीय शिबीरासाठी निमंत्रित असतील असेही यावेळी असे राजकिशोर मोदी यांनी यावेळी सांगितले.
दुसर्‍या सत्राची सुरूवात सायं.6 वाजता नवा मोंढा मैदानावरील जाहीर सभेने होणार आहे.या जाहीर सभेस मराठवाड्यातील उपस्थित काँग्रेसजणांना वरील सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण हे राहणार असून यावेळी उपरोक्त मान्यवरांसह सुप्रसिद्ध शायर इमरान प्रतापगढी यांची उपस्थिती राहणार आहे.नवा मोंढा येथे होणारा
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या जाहीर सभेस 50 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी राजकिशोर मोदी यांनी दिली.
तरी मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबीरास व जाहिर सभेस बीड जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आजी-माजी मंत्री,खासदार, आमदार,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व सेलचे आजी माजी पदाधिकारी,आजी -माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिति सदस्य,पक्षाचे आजी माजी नगरसेवक,आय काँग्रेस,युवक काँग्रेस, महीला काँग्रेस, अल्पसंख्यांक आघाडी, एनएसयुआय,
अनुसूचीत जाती विभाग ओबीसी सेल,ग्रंथालय विभाग,सेवादल,सर्व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,सोशल मिडिया व सर्वच सेल,सरपंच, उपसरपंच यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.