सिनेमा चौकात वरली मटका खुलेआमपणे सुरू – पोलीसांचे दुर्लक्ष

648
जाहिरात
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     चांदूर रेल्वे शहरातील सिनेमा चौकात राजरोसपणे वरली मटका सुरू असून याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
        शहरातील सिनेमा चौकात गेल्या अनेक वर्षांपासुन वरली मटका व्यवसाय जोमात खुलेआमपणे सुरू आहे. शहराच्या ठिकाणी सुरू असलेला हा मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटकाबहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे एका पोलिसासोबत लागेबांधे असल्याची चर्चा होत आहे. चांदुर रेल्वे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे संसार या वरली मटक्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानांही कुठल्याही प्रकारचे अंकुश या ठिकाणी लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपुर्वी वृत्तपत्रांतुन बातम्या झळकताच अमरावती येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने शहरात टाकली होती. यावेळी केवळ तेथे काम करणाऱ्या एका युवकाला अटक केली होती. परंतु वरली मटका व्यवसाय करणाऱ्या संचालकाला अटक करण्यात आलेली नव्हती. यानंतर पुन्हा पुर्वरत वरली मटका सुरू झालेला आहे. वरली मटका सुरू असलेल्या भागात एका पोलीसाची ड्युटी असुन सदर कर्मचाऱ्याचे हात चांगलेच ओले झाल्याची चर्चा धडाक्यात सुरू आहे. याची साधी भनक सुध्दा वरिष्ठांना लागत नाही. त्यामुळे आता वरिष्ठांनी तातडीने दखल घेऊन सिनेमा चौकातील वरली व्यवसाय बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.  आता स्थानिक पोलीस धाड टाकुन या व्यवसायाच्या मुख्य संचालकाला अटक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।