आधुनिक चिकित्सेतील उपकरणांमुळे उपचार महागले ! – पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

0
1043

जोधपूर – आधुनिक चिकित्सापद्धतीमध्ये मोठी त्रुटी आहे. रुग्णाच्या शरिराच्या पुढे काहीही नाही, असेच या पद्धतीत मानले जाते. सूक्ष्म, कारण आणि स्थूल असे शरिराचे तीन भाग होतात. याचा अभ्यास वैदिक चिकित्सापद्धतीत करण्यात आला आहे, तो आधुनिक चिकित्सेमध्ये नाही. आयुर्वेदतज्ञ केवळ नाडी पाहून रोगाचे निदान करण्यासमवेत त्यावर उपचार करतात. दुसरीकडे आधुनिक उपचारपद्धतीत प्रतिदिन येणार्‍या नवनवीन उपकरणांमुळे ही उपचारपद्धत अत्यंत महाग ठरत आहे, असे प्रतिपादन पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले. ते येथील डॉ. एस्.एन्. मेडिकल कॉलेजमध्ये आधुनिक चिकित्सा विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

 

शंकराचार्य पुढे म्हणाले, विज्ञानाने कथित प्रगती केली आहे. हे विज्ञान स्वतःच्या सिद्धांतावर कधीच कायम रहात नाही. त्यांची औषधे एका कालमर्यादेनंतर वापरण्यायोग्य रहात नाहीत. आमच्या देशातील चरकसंहिता सांगते की, आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि त्याच्यावर या पंचमहाभूतांचा परिणाम होऊन आजार होतात. आजारी व्यक्तीवर केवळ औषधेच नाहीत, तर मंत्रांचे उपचारही आवश्यक असतात