अक्षय बंधुत्वाचा सुवर्ण स्पर्श:-सुनिल चव्हाण

473

सांगली/कडेगांव – हेमंत व्यास:-

सुनिल चव्हाण सर म्हणजे एक विनयशील,स्वागतशील व अस्वादक असेच एक व्यक्तीमत्व.त्यांच्या या विविध भुमीकामधील वावर पाहीलातर ती एक व्यक्ती नसुन मानवतावादाने भरलेल आणि विश्वबंधुत्वाची साक्ष देणार जात,धर्म,पंत,पक्ष गोत्र या पलीकडे जावून स्नेह आणि आपुलरीचे शिंपण घालणारे आणि मानवीमुल्यांचे अधिष्ठान प्राणपणाने जपणारे स्वत:चे आयुष्य समाज सेवेसाठी वाहुन घेतलेले एक चालते बोलते विद्यापीठचआहे.

साहीत्य,संस्कृती,समाजकारण दातृत्व आणि कर्तृत्व या क्षेत्रातील त्यांचा वावर हा मानवी मनाला उभारी देणारा असतो.वाणी आणि लेखणीवर प्रचंड श्रध्दा व स्वत:भोवती जमलेल्या माणसांच्या गोतावळ्यावर सात्वीक प्रेमाची उधळण हे एकमेव त्यांच्या जीवनाचे सार आहे.आई- वडीलांच्या संस्काराची शिदोरी आणि विद्यार्थीदशेपासुन द्न्यानाची प्रचंड आवक यामुळे सुनिल चव्हाण सरांनी अनेकांच्या आयुष्यात उत्कृष्ठ गुरूची,मित्रत्वाची मार्गदर्शक होण्याची भुमिका पार पाडली.सामाजिक विकासाचे आणि उन्नत्तीचे स्वप्न उराशी बाळगुन मैलोनमैल पायपीट करणारा हा अवलिया एखाद्याच्या आयुष्यात आला की,त्या कुटुंबाचा आजिवसदस्य बनुन जातो.

रूंदावलेली सामाजिक दरी सांधण्याचे शिक्षण देणे हा एकमेव भरवशाचा मार्ग असलेल्या जाणीवेतुन उपेक्षीतांच्या आकांक्षाना मृतरूप देत शिक्षणांची गंगोत्री गोर-गरीबांच्या झोपडीत पोहचावी व त्यातून उद्याचे आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी निर्माण व्हावेत.या ध्येयभावनेतुन तब्बल २७५००० पुस्तकांचे अक्षय अक्षरदान करून स्व.डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील, स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या भरीव योगदानाबरोबरच त्यांची खरी वैचारीक वारसदारी चालु ठेवली.सुनिल चव्हाण सरांचे संघटन कौशल्य वाखाणण्या सारखे तर आहेच व अभिनंदनिय व अनुकरणीय असे आहे.कोणतीही भौतिक आसक्ती नसलेल्या एका महान योगी पुरूषासारखे त्यांचे जीवन अनकांचे आदर्श स्थान आहे.गेली २५ वर्षे डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या छत्र छायेखाली राहुन भारती विद्यापीठात आदर्श सेवकांचा नवा आयाम घालुन दिला.आपल्या आयुष्यात कधी त्यांनी राजकीय कोलांट्या मारल्या नाहीत किंवा आपल्या विचारांशी तत्वाशी कधी प्रतारणा केली नाही.त्यांनी सतत अधुनिकता आणि नाविण्याचा ध्यास घेत समाजाला नवविचार आणि प्रेरणा देण्याचे कार्य केले.त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जीवनाचे खरे अध्यात्म जगणारी व्यक्ती हाच साक्षात्कार होतो.त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची जगण्याची क्षितिज विस्तारली.त्यांनी स्वत:बरोबरच अनेकांना सतत वैचारीकदृष्ट्या धारदार ठेवले.त्यांचा साहीत्य विश्वातील वावर अचंबीत करणारा आहे.उजळाईवाडीच्या चार साडे चार वर्षाच्या रेहान नदाफ बालकापासुन ते गानसम्राद्नी भारतरत्न लता दीदीचा कौटुंबीक स्नेह अनेकांना भावतो द्न्यानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे,श्रीमती विजसमाला कदम , डॉ.विश्वजीत कदम, डॉ.तात्याराव लहाने,डॉ.बेगानी,डॉ.सुनिलकुमार,डॉ.कौस्तुभ आमटे,मारूती चित्तमपल्ली,शामराव भोई,स्व.नारायण सुर्वे,नामदेवराव ढसाळ,वसंतराव डावखरे इ.मान्यवरांच्या व अभिजित घोरपडे,सुवर्णा खरात,सिध्दार्थ खरात इत्यादी दिग्गजांच्या स्नेहाने आणि करीश्म्याने त्यांच्या कार्याला गती आली.
वाणी व लेखणीच्या संस्काराने आजची पिढी खुप श्रीमंत व्हावी ही काळाची गरज आहे हे ओळखुन भविष्याचा वेध घेणारा सुजाण सुसंस्कृत समाजभान असणारा शिस्तप्रिय द्न्यानार्थी विद्यार्थी घडावा म्हणुन त्यांनी कर्नाटक,महाराष्ट्र राज्यात सुरू केलेली वाचन चळवळ देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील मैलाचा दगड ठरली.आपल्या आर्यन प्रकाशनामार्फत पदर मोड करून त्यांनी अनेक सृजनशील लेखकांना व्यासपीठ निर्माण करून दिली.

सरहद्दीवर प्राणांची बाजी लावत डोळ्यात तेल घालुन रात्रंदिवस देशसेवा करणाऱ्या व प्रसंगी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांना या रूणातुन उतराई व्हावी त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करता यावा म्हणुन त्यांनी सुरू केलेल्या वीर जवान फौंडेशन या देशभक्तीपर कार्यास आमच्या विदर्भ २४ न्युज च्या वतीने सुनिल चव्हाण सरांच्या अक्षयबंधुत्वाला अक्षयतृतीयाच्या शुभमुहुर्तावर आमच्या कडुन लाख लाख शुभेच्छा!!!