कठुवा बलात्कार व खून करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यासाठी – संग्रामपूर येथे सर्व धर्मीय समाजाने काढला मूक मोर्चा

0
1210
Google search engine
Google search engine

संग्रामपुर / दयालसिंग चव्हाण :-

– कठुवा येथे सामुहिक बलात्कार करून तिचा निर्घुन खुन करणाऱ्या संबंधीत हैवानांना कठोर शिक्षेसाठी संग्रामपुर जामा मस्जीद ते तहसिल कार्यालयापर्यत लक्षवेधी मुक मोर्चा आज दि १८ एप्रील रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मुस्लीम बांधवासह सर्व पक्षिय नेत्यांनी मूक मोर्चा काढण्यात आला.

कठुवा येथील अमानवीय माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध नोंदविण्या साठी संग्रामपुर तालुक्यातील मुस्ली बांधवासह सर्व धर्मीय समाजाच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मुक मोर्चा संग्रामपुर येथील जामा मस्जीद ते तहसिल कार्यालयावर अतिशय शिस्तबद्ध व शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढण्यात आला यात सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या मोर्च्यांत तहसील कार्यालय वर पोहचल्यावर राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, सामाजिक कार्यकर्ते अभयसिह मारोडे, भारिप बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चेतन घिवे, जमाते उलेमा ए हिंद चे मुफ्ती समी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की बलात्कार व खून करणाऱ्या नराधमांना फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हॉयला पाहिजे. त्या नंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये मुफ्ती समी, मौली जफर कासमी, मौली नईम, मौली इमरान, हाफिज साबीर, हाफिज इलियास, मौली जुबेर, जि प सदस्य भगतसिंग पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायणराव ढगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज ठाकरे, राजू आमटे, माजी उपसभापती राजू राठोड, माजी तालुकाध्यक्ष संतोष राजनकार, राहुल सिरसोले, संतोष टाकळकार, हमीदभाई पाशा, इरफान काझी, जलील सर, अकबरशेठ कुरेशी, शेख आसिफ, शेख शकील आदीसह तालुक्यातील हजारोच्या उपस्थिती मुस्लीम बांधव आणि सर्व धर्मीय समाजाचे पदाधिकारी उपस्थिती होती.