भगवान परशुराम जयंती शहरात उत्साहात साजरी – शोभायाञेने दुमदुमले चांदूर रेल्वे शहर

0
896
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

    चांदूर रेल्वे येथील राम मंदिर मध्ये सर्व शाखीय ब्राह्मण महासभा तर्फे बुधवारी परशुराम भगवान जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी ८.३० वाजता भगवान परशुरामजीचे पुरुसुक्ताने अभिषेक व विधिवत पुजा,आरती तळेगांव येथील जेष्ठ समाज बांधव वसंतराव कुलकर्णी, तालुका अध्यक्ष विनोद तिवारी यांच्या हस्ते करण्यात आली . या नंतर ब्राह्मण समाजाती युवकांनी शहरात मोठ्या उत्साहात मोटरसायकल रॅली काढली .परशुराम भगवान की जय, “कोण चले भाई, कोण चले, परशुरामजी के भक्त चले” अश्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने फिरत रॅली रेल्वे स्टेशन येथील रेल मंजदूर युनियन तर्फे सुरू असलेल्या रक्तदान शिबिरा स्थळी जावून सर्व शाखीय ब्राह्मण महासभा शाखा चांदूर रेल्वे समाजातील अनेक युवकांनी यावेळी रक्तदान करून “रक्तदान श्रेष्ठ दान” असा संदेश दिला.

       या नंतर सायंकाळी ७ वाजता सर्व शाखीय ब्राह्मण समाज बांधव तथा राजस्थानी ब्राह्मण महिला मंडळीने आपल्या परंपरेतील वेशभूषेत वस्ञ परीधान करून भगवान परशुरामजी च्या शोभायाञेत हजरी लावली. ही शोभा याञा राम मंदिर,सिनेमा चौक,गांधी चौक,जुना बस स्टॉप येथून फिरत मारवाडी लाईन मध्ये पोहचताच नगरसेवक महेश कलावटे व नारायण कलावटे, गुडूडू बजाज, माजी न.प.अध्यक्ष छोटूभाऊ विश्वकर्मा व नगराध्यक्ष निलेश ऊर्फ शिट्टू सुर्यवंशी यांनी पुजा करून हार अर्पण केले तर श्याम फुलवाले तर्फे रॅलीचे पुष्पांनी स्वागत करण्यात आले व घरोघरी या शोभायाञेचे पुजन करून फटाक्याच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी महिला भजन मंडळींनी भगवान रामचंद्र व परशुरामचे भजन करत शहरातील प्रमुख चौकातून भ्रमण करत असतांना जया बुट हाऊस चे संचालक जितेंद्र तिडवानी यांनी रॅली करीता पाण्याची तर रमाकांत शर्मा तर्फे थंड शरबतची व्यवस्था करण्यात आली. ही शोभायाञा राम मंदिर मध्ये आल्यानंतर सर्व परशुराम भक्तानी परीवारासह आरती पूजन करून भोजन प्रसाद घेऊन या शोभायाञेची सांगता केली. या शोभायाञेला शहरातील व तालुक्यातील सर्व शाखीय ब्राह्मण सभेतील पुरुष,महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी  अाशुतोष शर्मा, भूषण जोशी, रजत तिवारी, शिवराज शर्मा, सनी जोशी,राजू कलावटे,भरत कलावटे,मनिष निंरमुडे,दत्ता जोशी,सौरभ लांबे,कौस्तुभ लांबे,अंकीत जोशी,धिरज कलावटे,संयोग कलावटे, रमण तिवारी, सौरभ दशसहस्ञे,निरज दुबे,किरण जोशी,रोहित दुबे,निशांत शर्मा,माहिर कलावटे,आर्यन कलावटे,हर्ष कलावटे आशिष जोशी,अंकीत ओक,जगदीश कलावटे,हेमंत जोशी यांसह अनेकांनी अथक परीश्रम घेतले.