आता …. सहा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार -धक्कादायक

0
1220
Google search engine
Google search engine

इंदूर :- 

उन्नाव, कठुआ, सुरतमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनांनी देश हादरलेला असतानाच आता एका सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा देश हादरला असून देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे समोर आले आहे. या मुलीचा मृतदेह एका इमारतीच्या तळघरात सापडला असून या प्रकरणी पोलिसांनी सुनील भील (२१) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या मुलीच्या शवविच्छेदन अहवाालात मुलीच्या गुप्तांगावर जबर जखमा असल्याचे नमूद केले आहे.

पीडित मुलगी व तिचे आई वडील सिंदोरा भागातील फुटपाथवर राहतात. मुलीच्या वडिलांचा फुग्यांचा व्यवसाय होता. सुनील देखील त्याच फुटपाथवर राहायचा. तो पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र होता. शुक्रवारी रात्री मुलीचे आई वडील फुटपाथवर झोपलेले असताना सुनीलने मुलीचे अपहण केले. त्यानंतर तो झोपलेल्या त्या मुलीला घेऊन जवळच असलेल्या एका इमारतीच्या तळघरात गेला आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जमिनीवर जोरात आपटून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला व मुलीचे आई वडील झोपलेले तेथेच जाऊन झोपला.

 

याप्रकरणी पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही तपासले असता त्यात मुलीच्या पालकांचे सांत्वन करणारा सुनीलच त्या मुलीला घेऊन इमारतीत आल्याचे पोलिसांना दिसले. याप्रकरणी सुनीलला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.