युवासेनेचे चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन

0
1332
Google search engine
Google search engine

👉🏻शैक्षणिक कागद पत्र करीता शिबीर राबवा,

चांदुर बाजार:-

उन्हाळा सुरुवात झाली असून जवळ पास 10 वि आणि 12 च्या परीक्षा पण आपल्या आता निकाल लागणार आणि पुढील शैक्षणिक प्रवासाला सुरुवात होणार.मात्र प्रवेश घेण्यासाठी विध्यार्थी याना जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाण पत्राची आवश्यकता असते.या प्रमाण पत्रा मुळे विध्यार्थ्यांना नुकसान होऊ नये या करिता तहसील कार्यालय अंतर्गत शिबीर राबवून कागदपत्रे वाटप करण्याचे निवेदन चांदुर बाजार युवासेना पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले.

महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लावतो.त्यासाठी अनेक शैक्षणिक कागद पत्राची आवश्यकता असते तसेच प्रवेश या वेळ एकच असल्याने तहसील कार्यालय मध्ये तालुक्यातील अनेक पालक वर्ग आणि विध्यार्थी यांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याने आपणास पाहायला मिळते.याचा फायदा घेत काही खाजगी दलाल विध्यार्थी यांच्या पासून वाटेल तसा पैसे लुटत असल्याचे पण दिसून आले.त्यामुळे काही न प्रमाणपत्र मिळते तर काहीच प्रमानपत्रभावी प्रवेश मिळत नाही.या सर्व प्रश्न लक्ष्यात घेत युवासेना यांनी निवेदन दिले. यावेळी तालुका युवासेना अध्यक्ष शैलेश पांडे,उप तालुका अध्यक्ष पवन राऊत,गो.सी.टोम्पे महाविद्यालयात छात्र संघ सचिव यशकुमार करिया आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

*बॉक्स*
*स्थानिक पातळीवर राहणारे तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालयीन राहत नसल्याने याचा फटका विध्यार्थी वर्ग याना चांगला बसतो. कारण उन्हाळयात अधिकारी त्यांना उन्हाचा फटका बसत असल्याने घर बसल्या पगार घेण्याचे त्यांचे धोरण असते.*