चांदुर बाजार मध्ये ग्रामविकास अधिकारी मुख्यलयीन असल्याची माहिती नाही पंचायत समिती कडे
माहिती अधिकारात एकाही ग्रामविकास अधिकारी यांची माहीती नाही
चांदुर बाजार:-
चांदुर बाजार तालुक्यातील येणाऱ्या जवळपास 68 ग्रामपंचायत कार्यालय करीत 50 च्या जवळपास ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहे.मात्र या सर्व अधिकारी हे मुख्यलयीन राहत नसल्याचा कोणताच पुरावा किंवा तशी माहिती तालुक्यावर पंचायत समिती कार्यालय मध्ये नाही.तसेच थंडगार कुलर ची हवे घेणारे पंचायत समिती मधील अधिकारी यांना माहिती अधिकारात माहिती विचारली असता कॅवरीग लेटर दुसऱ्याचे नाव आणि आतल्या माहिती वर दुसऱ्याचे नाव दिसून आले.यावरून अधिकारी आपल्या कामात किती सतर्क आहे हे दिसून येते.
त्याच प्रमाणे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये 14 वित्त आयोग मार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.या निधीचा उपयोग हे काही ग्रामपंचायत मधील सचिव आणि सरपंच काही आपल्या जवळीक राजकीय पार्टी च्या लोकांना जवळ घेऊन उथळ पट्टी करत आहे.ग्रामीण भागातील सचिव हे मुख्यालयात फक्त आपले कमिशन वेळी दिसतात.
या मधील काही ग्रामपंचायत मध्ये महिला ग्रामविकास अधिकारी आहे. त्या तर फक्त ठरलेल्या 2 ते3 दिवस ग्रामपंचायत कार्यालयात दिसत असतात.त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांचा ग्रामभकास करण्यात मोठा वाटा दिसत असल्याचे चित्र आहे.
वरिष्ठ पातळीवर असनारे उच्च श्रेणी आनि सहायक गटविकास अधिकारी हे कोठे राहतात याची पंचायत समिती च्या दप्तरी नोंद नसल्याचे सुद्धा दिसुन येत आहे.त्यामुळे जनतेच्या समस्या निकाली कश्या निघणार असे प्रश्न तालुक्यातील जनते समोर आहे.
पंचायत समिती कार्यलाय अंतर्गत येणाऱ्या किती तरी तक्रार यांच्या विहित वेळेच्या आत कार्यवाही होत नाही त्यामुळे अश्या अधिकारी यांच्या शिस्त भंगाची कार्यवाही का केली जात नाही असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनते समोर आहे.मात्र मुख्यलयीन न राहून पगार घेणारे ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यची दाद द्यावी लागेल.